सुप्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाणं बरंच लोकप्रिय झालं. ‘गोल्डन ग्लोब्स पुरस्कार सोहळ्या’तही या गाण्याने पुरस्कार पटकवला आहे. ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजिनल गाण्यासाठी गोल्डन ग्लोब्स पुरस्कार मिळाला आहे. भारतीय सिनेमा आणि प्रेक्षकांसाठी हा अभिमानस्पद गोष्ट आहे. चित्रपटाच्या टीमच सगळीकडे कौतुक होत आहे. बॉलिवूडच्या बादशहानेदेखील यांचं कौतुक केलं आहे.

शाहरुख खान सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. नुकताच त्याचा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरवरून दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी शाहरुख खानचे ट्वीटरवर कौतुक केले त्यावरच आता शाहरुख खानने रिप्लाय दिला आहे की, “सर नुकताच उठलो आणि नाटू नाटू’ गाण्याला गोल्डन ग्लोब्स पुरस्कार मिळाल्याबद्दल मी नाचू लागलो. आणखीन अनेक पुरस्कार आहेत ही भारतासाठी अभिमानस्पद गोष्ट आहे.” अशा शब्दात त्याने प्रतिक्रिया दिली.

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

Photos : ‘RRR’च्या ऑस्करवारीवर शाहरुखने केली भविष्यवाणी; राम चरणचे आभार मानत म्हणाला….

गोल्डन ग्लोब्स पुरस्कार सोहळ्यात ‘RRR’ चित्रपटाचं प्रतिनिधीत्व दिग्दर्शक एसएस राजामौली, ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी केलं. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी १९२० मधील ब्रिटिशकालीन भारतातील स्वतंत्र सेनानी कोमाराम भीम आणि अल्लूरी सीतारामाराजू यांच्या भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्यासह ब्रिटीश कलाकार रे स्टीवेन्सन, एलिसन डूडी आणि ओलिविया मॉरिस यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

दरम्यान, जागतिक पातळीवर ‘RRR’ ने १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. याआधी न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स सर्कल अवॉर्डमध्ये राजामौली यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. ‘RRR’ ऑस्करसाठीही सर्व कॅटेगरीमध्ये शॉर्टलिस्ट झाला आहे. त्यामुळे आता कोणत्याही एका कॅटेगरीमध्ये हा चित्रपट नॉमिनेट व्हावा अशी अपेक्षा आहे.