scorecardresearch

‘पॅटिस’ प्रेमाची लव्हेबल मेजवानी, लवकर येणार प्रेक्षकांच्या भेटीला

प्रेमात दडलेली एक वेगळीच कहाणी आपल्याला या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

patis, marathi movie,
प्रेमात दडलेली एक वेगळीच कहाणी आपल्याला या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

अनेकांच्या आवडीच्या खादयपदार्थांमध्ये ‘पॅटिस’चा अवश्य समावेश असतो. गरम, खमंग ‘पॅटिस’ म्हणजे खवय्यांसाठी मेजवानीच असते. प्रेमाचंही असंच काहीसं असतं. विश्वास आणि आपुलकीचं सारण छान जमून आलं की प्रेमाची लज्जत अजून वाढते. लव्हेबल प्रेमाची अशीच चटकदार मेजवानी असलेला पोस्टमन फिल्मस प्रस्तुत ‘पॅटिस’ हा हटके शीर्षकाचा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रत्येकाच्या प्रेमात एक वेगळीच कहाणी दडलेली असते. अनेक रंजक वळणे घेत खुलणाऱ्या पॅटिसच्या प्रेमकथेमध्येही काही गोष्टींचा उलगडा होणार आहे. हा उलगडा नेमका कोणता? आणि तो कसा होणार? याची रोमांचक कथा म्हणजे ‘पॅटिस’ चित्रपट. या सस्पेन्स लव्हस्टोरीत बिपीन सुर्वे आणि श्रेया देशमुख ही नवीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या दोघांसोबत अनेक दिग्गज कलाकार तसेच ओमकार बोत्रे, अश्विनी भांडे, विनोद खेडकर हे सहाय्यक कलाकार चित्रपटात झळकणार आहेत. ‘पॅटिस’चे चित्रीकरण बनारस आणि मनाली (हिमाचल प्रदेश) येथे लवकरच सुरु होणार आहे.

आणखी वाचा : “यांची मुलं यांना पाहून…”; हृतिक-सबा, सुझान आणि अर्सलन गोणीला एकत्र पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी केले ट्रोल

या चित्रपटाची निर्मीती डॉ. मानिगंडन मंजुनाथन आणि राहुल पाटील यांनी केली आहे. लेखन आणि दिग्दर्शन धीरज आदिक यांचे आहे. चित्रपटाचे संवाद वैभव घोडेस्वार यांनी लिहिले आहेत. संगीत प्रज्वल यादव यांचे आहे. कला दिग्दर्शनाची जबाबदारी नितेश नांदगावकर यांनी सांभाळली आहे.हे चटकदार ‘पॅटिस’ प्रत्येकाचे निखळ मनोरंजन करेल अशा विश्वास निर्माता–दिग्दर्शक व्यक्त करतात.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Patis upcoming marathi movie dcp

ताज्या बातम्या