Patrick Stewart Passed Away: हॉलीवूडचे लोकप्रिय अभिनेते पॅट्रिक स्टीवर्ट (Patrick Stewart) यांचे निधन झाले आहे. त्यांनी ‘स्टार ट्रेक'(Star Trek) आणि ‘एक्स-मेन'(X-Men) यांसारख्या सिनेमांतून प्रेक्षकांची मने जिंकली होती. पॅट्रिक स्टीवर्ट यांनी ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

अल्झायमर आणि लेवी बॉडी डिमेन्शिया आजाराने होते ग्रस्त

समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी लॉस एंजेलिस येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अल्झायमर आणि लेवी (Lewy Body Dementia) बॉडी डिमेन्शिया या आजारांचा ते सामना करत होते. त्यांच्या प्रवक्त्या केली बुश नोव्हाक यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली.

पॅट्रिक स्टीवर्ट यांच्या निधनानंतर अभिनेता ह्यू जॅकमनने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली. त्याने लिहिले, “आज आपण रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील एका उत्तम कलाकाराला गमावलं आहे, ते एक उत्तम मित्र आणि माणूस होते. त्यांच्याकडून मी खूप काही शिकलो. पॅट्रिक मला तुमची कायम आठवण येत राहील.”

पॅट्रिक स्टीवर्ट यांच्या कामाबद्दल बोलायचे तर त्यांनी ‘एक्स-मेन’मध्ये प्रोफेसर चार्ल्स झवियर ( Charles Xavier ), तर ‘स्टार ट्रेक: द नेक्स्ट जनरेशन’मध्ये कॅप्टन जीन-ल्यूक पिकार्ड ही भूमिका साकारली होती.

या भूमिकांमुळे त्यांना जगभरात लोकप्रियता मिळाली. मात्र, चित्रपट आणि मालिकांपेक्षा त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील अधिक काळ रंगभूमीवर घालवला. त्यांनी शेक्सपिअरच्या अनेक नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. क्लॉडियसपासून मॅकबेथपर्यंत विविध व्यक्तिरेखांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.