छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा ‘पावनखिंड’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दहा दिवसांपूर्वी म्हणजे १८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या सगळ्यात अभिनेता चिन्मय मांडलेकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपट OTT प्रदर्शित न करता चित्रपटगृहात का प्रदर्शित केला त्याचे कारण सांगितले आहे.

या चित्रपटात चिन्मयने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. ‘पावनखिंड’ चित्रपटगृहात पाहायला आलेल्या प्रेक्षकांचा व्हिडीओ शेअर करत चिन्मय म्हणाला, “गेल्या दोन वर्षात अनेकांनी विचारलं ‘पावनखिंड’ OTT वर का प्रदर्शित करत नाही? हे आहे त्याचं उत्तर. स्वास्थ्यासाठी सामाजिक अंतर राखायलाच हवं. पण सामाजिक स्वास्थ्यासाठी लोकांनी एकत्र येऊन काहीतरी साजरं ही करायला हवं. प्रेक्षकहो तुम्ही ‘पावनखिंड’ साजरा करताय. आम्ही धन्य झालो!” चिन्मयची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
marathi movie hoy maharaja
प्रथमेश परबचा ‘होय महाराजा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, मराठी विनोदवीरांची चित्रपटात मांदियाळी
Mrunmayee Deshpande talks about her character in Swargandharva Sudhir Phadke Movie
इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे मृण्मयी देशपांडेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका, म्हणाली, “माझ्याबाबतीत…”

आणखी वाचा : “मला सुद्धा मराठी चित्रपट करायचाय, जर नागराज…”; झुंड पाहिल्यानंतर आमिरने केले वक्तव्य

आणखी वाचा : “गळ्यात कच्चा बादाम अडकलाय का?” रानू मंडल यांचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी लावला कपाळाला हात

दरम्यान, हा व्हिडीओ पुण्याच्या राहुल चित्रपटगृहातील आहे. या चित्रपटगृहात चित्रपट पाहायला आलेल्या तरुणांनी एकत्र येत अंगावर शहारा आणणारे शिवगीत गात ‘पावनखिंड’ला प्रतिसाद दिला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…

‘पावनखिंड’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज दहा दिवस झाले आहेत. परंतु आजही पहिल्या दिवसा इतकीच एवढंच काय तर त्यापेक्षा जास्त गर्दी चित्रपटगृहांत पाहायला मिळत आहे. चित्रपटगृहाच्या बाहेर हाऊसफुलचे बोर्ड लावण्यात आले आहेत. १० दिवसात या चित्रपटाने तब्बल १६.७१ कोटींचा गल्ला केला आहे. हा पहिलाच मराठी चित्रपट आहे ज्याने बॉक्स ऑफिसवर इतकी कमाई आणि प्रत्येक केली आहे.