बिग बॉसच्या घरात ती करणार ‘पहरेदारी’!

‘पहरेदार पिया की’ मालिकेत तेजस्वीने मुख्य भूमिका साकारलेली.

पहरेदार पिया की, तेजस्वी प्रकाश

टेलिव्हिजनवरील वादग्रस्त मालिका ‘पहरेदार पिया की’मध्ये काम करणारी अभिनेत्री तेजस्वी प्रकाश गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चेत आहे. मालिका बंद झाल्यानंतर तेजस्वी आता बिग बॉसच्या घरात ‘पहरेदारी’ करताना दिसणार असल्याचे म्हटले जातेय. ‘बिग बॉस ११’ लवकरच सुरु होणार असून, यात तेजस्वी सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून सहभागी होण्याची शक्यता आहे.

वाचा : ‘या’ चार चुका कपिल शर्माला पडल्या महागात

बिग बॉसच्या घरात कोणत्या सेलिब्रिटींना एण्ट्री मिळणार यावर बऱ्याच दिवसांपासून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यात आता स्पर्धकांमध्ये तेजस्वीसुद्धा दिसणार असल्याची चर्चा आहे. ‘इंडियन फोरम’च्या वृत्तानुसार, ‘बिग बॉस’च्या ११ व्या सिझनसाठी तेजस्वीला विचारणा करण्यात आलीये. तिने या वादग्रस्त शोचा हिस्सा व्हावे, अशी निर्मात्यांची इच्छा आहे. यावर तेजस्वी म्हणाली की, ‘होय, मला शोसाठी विचारण्यात आलेय. पण, बिग बॉस शोमध्ये जावे की नाही, याबाबत मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. सध्या सोनी टीव्ही वाहिनीसोबत एका मालिकेसाठी मी काम करतेय.’

वाचा : जाणून घ्या, अजयच्या ‘बादशाहो’ची पहिल्या दिवसाची कमाई

‘पहरेदार पिया की’ मालिकेत तेजस्वीने मुख्य भूमिका साकारलेली. मात्र, कथेवरून झालेल्या वादामुळे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मालिका बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर या आठवड्यापासून मालिकेचे प्रसारण बंद करण्यात आले. १० वर्षांच्या मुलाचे १८ वर्षांच्या मुलीशी लग्न झाल्याचे मालिकेत दाखविण्यात आले होते. अशा कथेमुळे बालविवाह प्रथेचा प्रसार होत असल्याचा आरोप करत अनेक प्रेक्षकांनी या मालिकेला विरोध केलेला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pehredaar piya ki actor tejaswi prakash may be participate in bigg boss 11 season

ताज्या बातम्या