लॉकडाउनमुळे अभिनेत्री अडकली लंडनमध्ये; एक झलक पाहण्यासाठी फॅन्स घराखाली करतात गर्दी

या अभिनेत्रीला होतोय अती लोकप्रियतेचा त्रास

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे सध्या लंडनमध्ये आहे. लॉकडाउनमुळे ती लंडनमध्येच अडकली आहे. मात्र काळात तिने विदेशातही स्वत:ची अशी अनोखी ओळख निर्माण केली आहे. परिणामी तिला पाहण्यासाठी दररोज तिच्या घराबाहेर गर्दी होते. अन् आता या वाढत जाणाऱ्या लोकप्रियतेचा तिला त्रास होऊ लागला आहे.

अवश्य पाहा – “खरंच माफी मागायची गरज नव्हती”; सलमानच्या ‘त्या’ ट्विटवर सोना मोहापात्रा संतापली

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत राधिकाने लंडनमध्ये येणारा आपला अनोखा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ती म्हणाली, “भारतीय वेब सीरिज आता लंडनमध्येही मोठ्या प्रमाणावर पाहिल्या जात आहेत. परिणामी विदेशातील प्रेक्षकही आता मला अभिनेत्री म्हणून ओळखू लागले आहेत. रोज माझ्या घरासमोर मला पाहण्यासाठी गर्दी होते. सुरुवातीला हे मजेशीर वाटलं, पण आता त्याचा त्रास होतोय. कधीही कोणीही मला पाहून रस्त्यांवर जोरजोराने ओरडू लागेल याचा पत्ता नाही. असा प्रकार तीन चार वेळा माझ्यासोबत घडला आहे.” असा अनुभव राधिकाने सांगितला. राधिका आपटे बॉलिवूडमधील आघाडिच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. ‘सेक्रेड गेम्स’, ‘घोल’, ‘लस्ट स्टोरिज’ यांसारख्या अनेक लोकप्रिय वेब सीरिजमध्ये काम केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: People waiting outside for me in london says radhika apte mppg