scorecardresearch

कमाल केली या पोरांनी! थेट शाहिद-करिनालाच टक्कर दिली? Jab We Met सिनेमातील गाणंच रिक्रिएट केलं, भन्नाट Video पाहिलात का?

शाहिद कपूर आणि करिना कपूर खान स्टारर जब वी मेट सिनेमातील एका गाण्याच्या रिक्रिएशनचा व्हिडीओ झाला व्हायरल.

कमाल केली या पोरांनी! थेट शाहिद-करिनालाच टक्कर दिली? Jab We Met सिनेमातील गाणंच रिक्रिएट केलं, भन्नाट Video पाहिलात का?
जब वी मेट सिनेमातील आओ मिलो चले या गाण्याचं रिक्रिएशन केलं आहे. (image-social media)

jab we met movie song recreation video : शहिद कपूर आणि करिना कपूर खान स्टारर जब वी मेट सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजला होता. या सिनेमात शाहिद-करिनाची केमेस्ट्रीने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडलीच. पण या सिनेमातील गाण्यांचंही सिनेचाहत्यांना प्रचंड वेड लागलं. ‘आओ मिलो चलें’ या गाण्यानं तर सिनेविश्वात धुमाकूळच घातला होता. त्यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईतच बनला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण इंडोनेशियाच्या युट्यूबर्सनेही या गाण्याचं अप्रतिम रिक्रिएशन केलं आहे. शाहिद आणि करिनाच्या या गाण्यावरील जबरदस्त डान्स स्टेप्स जशाच्या तशा उतरवण्याचा प्रयत्न या तरुणांनी केला आहे. डान्सच्या हुबेहुब स्टेप्स करताना इंडोनेशीयाचे कलाकार या व्हिडीओत दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

हा व्हिडीओ प्ले केल्यानंतर दोन स्क्रीन दिसतात. एका स्क्रीनवर शाहिद-करिनाचं गाणं सुरु होतं, तर दुसऱ्या स्क्रीनवर हुबेहुब मांडणी केलेल्या तरुणांचा व्हिडीओ दिसतो. व्हिडीओ जसजसा पुढे जातो या तरुणांनी शूट केलेले सीन्सही या व्हिडीओत पाहायला मिळतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यापासून आतापर्यंत जवळपास १ लाखाहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. तसंच नेटकऱ्यांनी या व्हिडीओला छान प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

इथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर युट्यूबरने प्रतिक्रिया देत म्हटलं, वीणा आणि तिच्या टीमने कॉश्च्यूम ते लोकेशन्सपर्यंतची सर्व कामे व्यवस्थीत हाताळल्याने मला आनंद वाटलं. त्यांच्या मेहनतीला माझा सलाम. वीणा आणि जॉर्डीची केमेस्ट्री खूपच सुंदर आहे. व्हिडीओ प्ले केल्यानंतर खरं गाणं पाहत असल्यासारखं वाटतं. वीणा हे खूपच जबरदस्त आहे. तू खूप मेहनती मुलगी आहेस. भारताकडून तुला खूप सारं प्रेम…तसंच दुसरा एक युट्यूबर प्रतिक्रिया देताना म्हणला, “खूप छान, ग्रेट वर्क, असंच सुरु राहुद्या.” तस तिसऱ्याने म्हटलं, मला हा सिनेमा खूप आवडतो. या सिनेमातील गाणीही आवडतात. तसंच हा रिमेकही छान आहे.”

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2022 at 14:29 IST

संबंधित बातम्या