बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पीके’ आज सर्वत्र प्रदर्शित होत आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित या चित्रपटात आमिर खान आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विधू विनोद चोप्राची निर्मिती असलेल्या ‘पीके’मध्ये संजय दत्त, सुशांत सिंग राजपूत आणि बूमन इराणी यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाने सर्वांमध्येच उत्सुकता निर्माण केली आहे. पण, तरीही जर तुम्हाला शंका असेल की हा चित्रपट पहावा की नाही तर आम्ही तुमच्यासाठी पाच कारणे घेऊन आलो आहोत. त्यामुळे तुम्ही हा चित्रपट नक्कीच पाहाल.
पाहा: ‘पीके’च्या संवादांसाठी आमिरने घेतलेली मेहनत
१. आमिर खान-राजकुमार हिराणीः या दोघांनी यापूर्वी हिट चित्रपट ‘३ इडियट्स’ साठी एकत्र काम केले होते. ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांवर जादू चालवेल याबाबत काहीच शंका नाही. आमिर आणि राजकुमार हिरानी या जोडगोळीच्या ‘थ्री इडियट्स’ चित्रपटाने एकूण ३९५ कोटींची कमाई क रत विक्रम केला होता. हा विक्रम अजून कोणालाही मोडता आलेला नाही. ‘हॅप्पी न्यू इअर’नेही एकूण ३७७ कोटी कमाई केली असली तरी तो ‘थ्री इडियट्स’चा विक्रम मोडू शकलेला नाही. आता या जोडीचा दुसरा चित्रपट ‘पीके’ हा विक्रम मोडणार का? हे लवकरचं कळेल.
आमिरचा लकी ‘डिसेंबर’
२. रहस्यः प्रेक्षकांना आश्चर्यचकित करण्यात आमिरचा हातखंडा असून तो आता पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का देण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटाने लोकांमध्ये उत्सुकता तर निर्माण केलीच आहे. पण, ‘पीके’च्या संपूर्ण टीमने चित्रपटाच्या कथेच रहस्य अद्याप उलगडू दिलेले नाही. या विनोदी चित्रपटाची कथा नक्की काय आहे? याचा थांगपत्ताही कोणाला नाही. कोणी म्हणत हा चित्रपट अक्षय कुमारच्या ‘ओएमजीः ओह माय गॉड’सारखा आहे तर कोणी म्हणत चित्रपटात आमिर एलियन सारखे वागतो. आता चित्रपट नक्की कशावर आहे हे तर आज पाहिल्यावरच कळेल.
पाहा: कोण ठरला ‘पीके’चा बॅटरी रिचार्ज?
३. अनुष्का शर्मा-सुशांत सिंग राजपूतः गेले दोन वर्ष अनुष्का पडद्यावर झळकलेली नाही. ‘जब तक है जान’नंतर अनुष्काने एकही चित्रपट केलेला नाही. आपल्या भूमिकांवर सतत प्रयोग करणा-या अनुष्काचे काम पाहणे नेहमीच मजेशीर असते. ‘काय पो छे’ अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अनुष्का ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
‘पीके’ चित्रपट ६ हजार चित्रपटगृहांत
४. संजय दत्त-बूमन इराणीः सध्या जेलमध्ये असलेल्या संजय दत्तने जेलमध्ये जाण्यापूर्वी या चित्रपटाचे चित्रीकरण केले होते. संजय दत्तलाही पडद्यावर बघितल्यावर बरेच महिने झाल्यामुळे त्यालाही काम करताना पाहणे त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाचे असेल. बूमन इराणीने ‘लगे रहो मुन्ना भाई’ आणि ‘३ इडियट्स’मध्ये राजकुमार हिराणीसोबत काम केले होते. बूमन पुन्हा एकदा आपल्याला भूमिकेला न्याय देतील अशी आशा आहे.
५. संगीतः अजय-अतुल, शांतनु मोइत्रा, अंकित तिवारी यांनी पीकेसाठी संगीत दिले आहे. ‘लव्ह इज वेस्ट ऑफ टाइम’, ‘नंगा पुंगा दोस्त’ ही गाणी सर्वत्र प्रसिद्ध झाली आहेत.
‘पीके’कडून शिकण्यासारख्या पाच गोष्टी
चित्रपटाच्या प्रसिद्धीकरिता आमिरने वेगवेगळ्या शहरात जाऊन भेट दिली. ५२०० चित्रपटगृहे आणि परदेशातील ८२० चित्रपटगृहांमधून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणावर प्रदर्शित केला जाणारा ‘पीके’ हा पहिलाच चित्रपट ठरला आहे.
‘पीके’च्या स्क्रिनिंगला राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकरची हजेरी