Video: ‘आतापर्यंत चित्रपट केले बॉलिवूडसाठी…’, माधुरी दीक्षितने घेतलेला खास उखाणा ऐकलात का?

एका मराठी कार्यक्रमात हजेरी लावल्याने माधुरी आनंदी आणि उत्साही होती.

madhuri dixit, madhuri dixit ukhana,
आपल्या अदांनी, सौंदर्याने आणि नृत्याने घायाळ करणारी ‘धक धक गर्ल’ म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित. नृत्यात तर तिला कोणीच मात देऊ शकत नाही. स्मितहास्य अन् लाजाळू भाव तिच्या सौंर्याला चार चाँद लावतात. तिचे जगभरात लाखो चाहते आहेत. नुकताच माधुरीने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. एका मराठी कार्यक्रमात हजेरी लावल्याने माधुरी आनंदी आणि उत्साही होती. दरम्यान या कार्यक्रमात माधुरीने उखाणा घेतला आहे.

नुकताच माधुरीच्या हस्ते ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी तिने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. त्यावर तिने ज्वेलरी देखील घातली होती. या लूकमध्ये माधुरी अतिशय सुंदर दिसत होती. या कार्यक्रमात माधुरीला उखाणा घेण्यास सांगितले होते. त्यावेळी माधुरीला काय उखाणा घ्यावा हे सुचत नव्हते. मराठमोळा अभिनेता पुष्कर शोत्रीने माधुरीला उखाणा घेण्यास मदत केली.

फोटो: २५० कोटींची मालकीण माधुरी दीक्षित राहते मुंबईतील आलिशान बंगल्यात

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

‘आतापर्यंत सगळे चित्रपट केले बॉलिवूडसाठी, आता माझं खरं माहेर प्लॅनेट मराठी’ असा उखाणा माधुरीने घेतला आहे. तिचा हा व्हिडीओ ‘राजश्री मराठी’ने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेत आहे. चाहते या व्हिडीओवर कमेंट करताना दिसत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Planet marathi launch event madhuru dixit ukhana avb