दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. चित्रपटसृष्टीत सर्वात मानाचा असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्काराने रजनीकांत यांना सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी रणजीकांत यांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. “पिढ्यांपिढ्या लोकप्रिय, वेगवेगळ्या भूमिका, एक प्रेमळ व्यक्तीमत्व…श्री रजनीकांत तुमच्यासाठी..थलायवा यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ही अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यांचे अभिनंदन,” अशा आशायाचे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

आणखी वाचा- बस कंडक्टर ते सुपरस्टार; रजनीकांत यांचा प्रेरणादायी प्रवास

याआधी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारी राज्यघटनेचे कलम ३७० काढून टाकल्यानंतर रजनीकांत यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केले आणि त्यांना महाभारतचे कृष्ण आणि अर्जुन म्हटले होते.