Raj Kundra Pornography Case: मुंबई पोलिसांना राज कुंद्राच्या मोबाईल, लॅपटॉपमध्ये सापडले ११९ पॉर्न

राज कुंद्राला 50 हजारांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केलाय.

raj-kundra-bail
(File Photo)

पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला दिलासा मिळाला आहे. मुंबईतील मॅजिस्ट्रेट कोर्टानेकडून राज कुंद्राला जामीन मंजूर करण्यात आला आहे. राज कुंद्राची आज जामीनावर सुटका होणार आहे. ६२ दिवसांनी राज कुंद्राची न्यायालयिन कोठडीतून सुटका होतेय. तर राज कुद्रांविरोधातील पॉर्नोग्राफी प्ररकरणाच्या तपासात आता मुंबई पोलिसाच्या हाती आणखी काही पुरावे लागले आहेत.

पोर्नोग्राफी प्रकरणाच्या तपासादरम्यान, पोलिसांना राज कुंद्राच्या मोबाईल, लॅपटॉप आणि हार्ड ड्राइव्ह डिस्कमधून 119 अश्लील व्हिडिओ सापडल्याचं वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिलंय. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार राज कुंद्रा हे व्हिडीओ ९ कोटी रुपयांना विकणार होता. 19 जुलैला मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला अटक केली होती.

राज कुंद्राला 50 हजारांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने राज कुंद्राला जामीन मंजूर केलाय. राज कुंद्रासोबतच त्याचा साथीदार रायन थोरोपेलाही न्यायालयाने 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केलाय. दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाने राज कुंद्राविरोधात एस्प्लेनेड न्यायालयासमोर 1500 पानी पुरवणी आरोपपत्र सादर केले आहे. या आरोपपत्रात शिल्पा शेट्टीसह ४३ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

शिल्पा शेट्टीने नोंदवला होता जबाब

शिल्पाच्या साक्षीनुसार, राज कुंद्रा यांने २०१५ मध्ये “विआन इंडस्ट्रीज ली.’ नावाची कंपनी सुरू केली होती. त्या कंपनीमध्ये शिल्पा शेट्टीचे २४.५० टक्के समभाग होते. या कंपनीत शिल्पा एप्रिल २०१५ ते जुलै २०२० या कालावधीत संचालक पदावर होती. त्यानंतर तिने वैयक्तिक कारणास्तव संचालकपदाचा राजीनामा दिला असल्याचे साक्षीत सांगितले. हॉटशॉट अ‍ॅप व बॉली फेम या संदर्भात आपल्याला काही माहिती नसल्याचे तिने सांगितले. कामात व्यस्त असल्याने पती राज कुंद्रा काय करतो त्यांना माहिती नसल्याचे शिल्पाने जबाबात सांगितले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Police found 119 porn videos from businessman raj kundras mobile laptop and a hardrive in pornography case kpw