सैराटमधील आर्चीची एक झलक पाहण्यासाठी जमलेल्या तरुणाईला सोमवारी कवठेमहांकाळमध्ये पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागला. तर दुसऱ्या एका घटनेत चित्रपटगृहात सराट पाहण्यास आलेल्या दोन तरुणांच्या गटात आज मिरजेत मारामारीचा प्रसंग उद्भवला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

सैराट या लोकप्रिय ठरलेली रिंकू राजगुरू आज कवठे महांकाळ येथे आली होती. एका खासगी दुकानाच्या उद्घाटनासाठी तिला बोलावण्यात आले होते. सकाळी महांकाली कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे, जिल्हा परिषद सदस्य गजानन कोठावळे, शिवपुत्र कोरे आदींच्या उपस्थितीत दुकानाचे उद्घाटन करण्यात आले.

तिला पाहण्यासाठी कवठे महांकाळला तरुणाईची प्रचंड गर्दी झाली होती. आर्चीला जवळून पाहण्यासाठी आणि तिच्यासोबत जमलेच तर सेल्फी घेण्यासाठी तरुणाईची झुंबड उडाली होती. मात्र िरकूला पाहण्यासाठी झालेली गर्दी पोलिसांना आवरता आली नाही. पोलिसांना बाय करीत आर्चीच्या दिशेने जाणारे तरुण रोखण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. दोन तासांचा कार्यक्रम आटोपून िरकू परत आपल्या गावी अकलूजला रवाना झाली असली,  दरम्यान, मिरज येथील शिवशंकर चित्रपटगृहात सिनेमा चालू असताना दोन गटात वादावादीनंतर मारामारी झाली. या मारामारीत कोणी जखमी झालेले नसले तरी पोलिसांनी सतर्कता म्हणून दोघांना ताब्यात घेतले आहे.