सुप्रसिद्ध तमिळ लेखक कल्की कृष्णमूर्ती यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या कादंबरीचे चाहते जगभरामध्ये आहेत. या कलाकृतीचे अनुवाद अनेक भाषांमध्ये करण्यात आले आहेत. या कादंबरीवर चित्रपट तयार करण्याचा प्रयत्न सर्वप्रथम एमजीआर यांनी केला होता. त्यानंतर मणी रत्नम यांनी कमल हासन यांना मध्यवर्ती भूमिकेमध्ये ठेवून चित्रपटाची पटकथा लिहायला सुरुवात केली. पण त्या कलाकृतीच्या व्याप्तीमुळे आणि बजेट नसल्यामुळे त्यांनी काम थांबवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण झाले. ३० सप्टेंबर २०२२ रोजी त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘पोन्नियिन सेल्वन भाग १’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, जयम रवी, कार्थी, त्रिशा कृष्णन अशा कलाकारांनी प्रमुख व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. हा बिगबजेट चित्रपट फक्त १५० दिवसांच्या कालावधीमध्ये तयार करण्यात आला आहे. ए. आर. रहमान यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.

मंत्री काम करत नाही म्हणून…” राजकीय प्रवेशावर सायली संजीवने दिले होते स्पष्टीकरण

या चित्रपटाद्वारे मणी रत्नम यांनी दक्षिण भारतामधील चोला राजघराण्याचा वैभवशाली इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. चित्रपटाने तब्बल ५०० कोटीची कमाई केली. पहिल्या भागानंतर आता याच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी मणीरत्नम यांनी सरप्राइज दिलं आहे.

या चित्रपटाचा दूसरा भाग म्हणजेच ‘पीएस २’ २८ एप्रिल २०२३ या दिवशी जगभरात प्रदर्शित होणार आहे. पहिल्या भागाप्रमाणेच हा भागही तमिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकतंच चित्रपट समीक्षक आणि ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी सोशल मिडिया पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे शिवाय त्यांनी चित्रपटाचं पोस्टरही शेअर केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ponniyan selvan 2 release date annouced by mani ratnam taran adarsh shares poster avn
First published on: 31-01-2023 at 14:13 IST