scorecardresearch

‘नग्नता हा गुन्हा असेल तर नागा साधूंना अटक करा’; अभिनेत्रीचा मिलिंद सोमणला पाठिंबा

अंगाला राख लावली म्हणून त्यांच्या नग्नतेचा स्विकार करायचा का?; अभिनेत्रीचा सवाल

गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर अश्लिल व्हिडीओ चित्रीत केल्याप्रकरणी पूनम पांडेला अटक करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच आता समुद्र किनाऱ्यावर न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी अभिनेता मिलिंद सोमणविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गोव्यातील वास्को पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणावर अभिनेत्री पूजा बेदी हिने प्रतिक्रिया दिली आहे. तिने मिलिंद सोमणची बाजू घेत “जर नग्नता हा गुन्हा असेल तर नागा साधूंना अटक का करत नाही?” असा सवाल उपस्थित केला आहे.

अवश्य पाहा – अभिनेत्रीनं शेअर केला ‘बाथरुम सेल्फी’; काही तासांत मिळाले ६ लाख व्हूज

“मिलिंदच्या फोटोमध्ये काहीही अश्लिल नाही. तो फोटो पाहून कल्पना करणाऱ्यांच्या डोक्यात अश्लिलता भरली आहे. त्याचा अपराध चांगलं दिसण, प्रसिद्ध होणं आणि बेंचमार्क प्रस्थापित करणं आहे. जर नग्नता हा अपराध असेल तर नागा साधूंना देखील अटक करा. ते केवळ शरीरावर राख लावतात म्हणून त्यांच्या नग्नतेचा स्विकार नाही करु शकत.” अशा आशयाचं ट्विट करुन पूजाने मिलिंद सोमणला पाठिंबा दिला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – तैमुर वडिलांसोबत करतोय शेती; छोट्या नवाबचे फोटो पाहून व्हाल थक्क

‘मिलिंद सोमणनं सोशल मीडियावर न्यूड फोटो अपलोड केल्यामुळे गोव्याच्या प्रतीमेचा आणि संस्कृतीचा अपमान झाला आहे,’ असं म्हणत गोवा सुरक्षा मंचानं वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. ४ नोव्हेंबर रोजी आपल्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त मिलिंद सोमणनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तो न्यूड होऊन धावताना दिसला होता. या फोटोसह त्यानं ‘हॅपी बर्थ डे टू मी’ असं कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. यापूर्वी अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिच्याविरोधात अश्लिल व्हिडीओचं चित्रीकरण केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर तिला आणि तिचा पती सॅम बॉम्बे यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pooja bedi milind soman nude photo mppg

ताज्या बातम्या