‘सत्तेत असलेल्यांनी प्राण्यांना न्याय मिळवून देण्याची गरज’; पूजा भट्ट संतापली

हिमाचल प्रदेशमध्ये एका गर्भवती गायीला खाण्यामधून स्फोटकं देण्यात आली

केरळच्या पलक्कड जिल्ह्यात गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खायला देण्यात आल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच असाच एक प्रकार हिमाचल प्रदेशमध्ये घडला आहे. एका गर्भवती गायीला खाण्यामधून स्फोटकं देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर सर्व स्तरांमधून या प्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे. यातच अभिनेत्री पूजा भट्टनेदेखील सोशल मीडियातून तिचा राग व्यक्त केला आहे.

पूजाने ट्विटरच्या माध्यमातून राग व्यक्त करत आता मुक्या प्राण्यांसाठी काही तरी ठोस पावले उचलायला हवीत असं म्हटलं आहे. हे अत्यंत वाईट कृत्य आहे. फटक्यांचा ज्या पद्धतीने वापर करण्यात येत आहे, तो त्वरीत थांबविला पाहिजे. प्राण्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध असलेले कायदे आणखी कठोर केले तरच काही तरी होऊ शकतं. तसंच सत्तेत असलेल्यांनी प्राण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असं पूजा म्हणाली.

दरम्यान, काही दिवसापूर्वी हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर जिल्ह्यात सोशल एका गर्भवती गायीला खाण्यामधून स्फोटके देण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ गायीच्या मालकाने सोशल मीडियावर शेअर केला आणि तो वाऱ्यासारखा व्हायरल झाला. गुर्दील सिंह असं या गायीच्या मालकाचं नाव असून त्याने या प्रकारासाठी आपला शेजारी नंदलालवर आरोप केला आहे. या व्हिडीओत गाईच्या जबड्याला जबर दुखापत झाल्याचं दिसून आलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pooja bhatt tweets about animal cruelty after himachal pradesh pregnant cow jaw blown off ssj