scorecardresearch

“माझं कौमार्य विकून मुलगी सोनाक्षीला अभिनेत्री बनवले”, अभिनेत्रीने केला शत्रुघ्न सिन्हांवर आरोप

अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हांवर हा धक्कादायक आरोप केला आहे.

pooja mishra, shatrughan sinha, sonakshi sinha,
अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हांवर हा धक्कादायक आरोप केला आहे.

‘बिग बॉस ५’ मधून प्रकाश झोतात आलेल्या पूजा मिश्राने बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूजाने शत्रुघ्न सिन्हा यांच्या कुटुंबावर तिचं करिअर आणि आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला. एवढंच नाही तर पूजाने शत्रुघ्न सिन्हा आणि कुटुंबीयांनी तिच्यासोबत ‘सेक्स स्कॅम’ केल्याचा दावाही केला. यासोबत शत्रुघ्न मला बेशुद्ध करायचे आणि व्यवसाय करायचे. त्यासोबतचं शत्रुघ्न सिन्हा यांनी माझं कौमार्य विकून मुलगी सोनाक्षीला अभिनेत्री बनवले असा धक्कादायक आरोप पूजाने केला आहे.

“गेल्या १७ वर्षांपासून मी हे सहन करत आहे. माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर तिने आत्महत्या केली असती”, असे देखील पूजा म्हणाली होती. पूजाचे वडील पद्माकर मिश्रा आयकर अधिकारी होते. याविशयी बोलताना पूजा म्हणाली, “बॉलीवूडमधील एका कुटुंबाने माझे करिअरच नाही तर वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त केले. मी शत्रुघ्न सिन्हा यांच्या विषयी बोलत आहे. ते माझ्या वडिलांचे खूप चांगले मित्र होते. माझे वडील आयकर आयुक्त होते आणि त्यांनी शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या संपूर्ण मित्र मंडळासाठी १००-१०० कोटींची मदत केली. गेल्या दोन दशकांपासून या कुटुंबाने माझा पिच्छा सोडला नाही. माझे वडील मुंबईत नोकरीवर असताना, पूनम सिन्हा यांनी वडिलांचं मतपरिवर्तन केलं. बॉलिवूडमध्ये फक्त देहविक्री करणाऱ्याच काम करतात असं त्यांनी बाबांना सांगितलं होतं. हा किती ढोंगीपणा आहे.”

आणखी वाचा : “आज ३ तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा…”, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

पूजा मिश्रा पुढे म्हणाली, “आज त्यांची मुलगी स्वतः (सोनाक्षी सिन्हा) बॉलिवूडमध्ये काम करत आहे, पण माझं करिअर संपवण्यासाठी त्यांनी माझ्या वडिलांना हे कारण दिलं. २००५ मध्ये माझे वडील निवृत्त होऊन पुण्यात आले होते. मी जेव्हा व्हिडिओकॉनच्या गेस्ट हाऊसमध्ये राहायचे तेव्हा पूनम सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा माझ्यावर काळी जादू करायचे. मी त्यांच्यापेक्षा जास्त प्रसिद्ध होऊ नये ही असुरक्षितता त्यांच्या मनात नेहमी असायची, म्हणूनच आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा कळतं की या लोकांनी माझे ३५ चित्रपट चोरले. माझा मार्ग अडवला. या सगळ्याला फक्त तेच जबाबदार आहेत. स्वतःला वाचवण्यासाठी या लोकांनी मला गोंधळात टाकलं होतं आणि हे सर्व आम्ही नाही तर सलमान खान, शाहरुख खानने केले आहे असे ते सांगायचे”

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pooja mishra shocking allegations on shatrughan sinha poonam sinha says they did sex scam and black magic on me as well as drugged me dcp

ताज्या बातम्या