न्यूड व्हिडीओ प्रकरणी पूनम पांडेला दिलासा

त्या व्हिडीओप्रकरणी पूनम पांडे विरोधात तक्रार

गोव्यातील चापोली धरणावर आक्षेपार्ह व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी अभिनेत्री पूनम पांडे व तिचा पती सॅम बॉम्बे यांना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात आता पूनमला जामीन मिळाला आहे. प्रत्येकी २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मिळाला आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. दरम्यान हा व्हिडीओ शूट केला जात असताना तिथे उपस्थित असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आलं आहे. शिवाय अश्लील व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवश्य पाहा – ‘आमच्या भावनांशी खेळ नकोस’; दया बेनच्या त्या फोटोंवर चाहते संतापले

प्रकरण काय आहे?

पूनम पांडे हनीमून साजरा करण्यासाठी गोवा येथे गेली होती. त्यावेळी तिने चापोली धरणावर एक आक्षेपार्ह व्हिडीओ शूट केला. लक्षवेधी बाब म्हणजे हे धरण पाटबंधारे खात्याच्या नियंत्रणाखाली आहे. या पार्श्वभूमीवर व्हिडीओबाबत गोवा फॉरवर्ड पक्षानं संताप व्यक्त केला. गोव्यामध्ये सरकारी जमिनीवर अश्लील व्हिडीओ शूट करण्याची संमती कोणी दिली? भाजपा गोव्याला पॉर्न डेस्टिनेशन करु पाहतेय का? असे सवाल करत त्यांनी पूनमवर जोरदार टीका केली. या तक्रारीनंतर पूनम पांडे व तिच्या पतीला पोलिसांनी अटक केली होती. गोवा फॉरवर्ड महिला शाखेच्या अध्यक्षा अश्मा सय्यद यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Poonam pandey granted bail in obscene video case mppg

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या