पूनम पांडेच्या पतीला पोलिसांनी केली अटक; मारहाण केल्याचा अभिनेत्रीचा आरोप

पूनमला पांडेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

Poonam pandey husband sam bombay arrested Mumbai police allegedly assaulting wife
पूनमने पतीवर मारहाणीचा आरोप केला होता

मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचा पती सॅम बॉम्बे याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पूनमने पतीवर मारहाणीचा आरोप केला होता, त्यानंतर पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी सॅमला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, तक्रार नोंदवल्यानंतर पूनमला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी सांगितले की, ‘सॅम बॉम्बेवर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अभिनेत्रीच्या डोक्याला, डोळ्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे.पूनम आणि सॅम यांच्यात झालेल्या भांडणाबद्दल फारशी माहिती नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पूनम पांडेने सॅम बॉम्बेवर मारहाणीचा आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही. पूनम आणि सॅमचे सप्टेंबर २०२० मध्ये लग्न झाले. लग्नानंतर काही दिवसांनी पूनमने सॅमवर शारीरिक छळ, धमक्या आणि मारहाणीचे आरोप केले. तिने गोव्यात तक्रार दाखल केली होती आणि सॅमने कथितपणे तिच्यावर हल्ला केला आणि धमकी दिल्याचे म्हटले होते. पूनम त्यावेळी गोव्यात शूटिंग करत होती. तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली पण दुसऱ्याच दिवशी त्याला जामीन मिळाला होता. त्यावेळी पूनम मला वेगळे व्हायचे आहे असे म्हणाली होती.

दरम्यान, पूनम आणि सॅमने १० सप्टेंबर २०२० रोजी लग्न केले होते. दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करून चाहत्यांना या लग्नाची माहिती दिली होती. लग्नापूर्वी सॅम आणि पूनम बराच काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Poonam pandey husband sam bombay arrested mumbai police allegedly assaulting wife abn

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या