scorecardresearch

‘बाहुबली’ चित्रपट लवकरच मराठीतून

आतापर्यंत हा चित्रपट हिंदी, जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, जपानी आणि चिनी भाषेतूनही डब करून प्रदर्शित झाला आहे. आता लवकरच आपल्याला मराठी भाषेत हा चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.

जगभरात लोकप्रिय ठरलेला ‘बाहुबली’ हा चित्रपट ‘शेमारू मराठीबाणा’ या वाहिनीवर दिवाळीच्या निमित्ताने मराठी भाषेतून दाखवण्यात येणार आहे. आतापर्यंत हा चित्रपट हिंदी, जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, जपानी आणि चिनी भाषेतूनही डब करून प्रदर्शित झाला आहे. आता लवकरच आपल्याला मराठी भाषेत हा चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. मराठीत या चित्रपटाला अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेता गश्मीर महाजनी, अभिनेते उदय सबनीस, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांसारख्या कलाकारांचा आवाज लाभला आहे, तर संगीतकार कौशल इनामदार, गायक आदर्श शिंदे, गायिका बेला शेंडेंसारखी मंडळीही या चित्रपटाशी जोडली गेली आहेत. जगभरात लोकप्रिय ठरलेल्या या चित्रपटाप्रति सन्मानाची भावना व्यक्त करत मराठीतूनही तो प्रेक्षकांना अनुभवायला मिळावा, या उद्देशाने ‘बाहुबली’ हा चित्रपट मराठीतून आणला असल्याची भूमिका ‘शेमारू मराठीबाणा’ या वाहिनीने स्पष्ट के ली. या मराठी आवृत्तीचे संपूर्ण लेखन स्नेहल तरडे यांनी केले असून चित्रपटाची कलात्मक जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘बाहुबली’ला आवाज दिला आहे. ‘देवसेना’ या पात्रासाठी सोनाली कुलकर्णीने आवाज दिला आहे, तर ‘शिवगामी’ या पात्राला अभिनेत्री मेघना एरंडे, ‘भल्लाल देव’ला अभिनेता गश्मीर महाजनी, तर ‘कटप्पा’साठी उदय सबनीस यांनी आवाज दिला आहे. ‘अवंतिका’ या व्यक्तिरेखेला संस्कृती बालगुडे हिचा आवाज लाभला आहे. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन कौशल इनामदार यांनी केले असून वैभव जोशी, मिलिंद जोशी, अस्मिता पांडे यांनी या चित्रपटासाठी गाणी लिहिली आहेत, तर आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, संजीव चिम्मलगी, हृषीकेश रानडे, हंसिका अय्यर, बेला शेंडे, केतकी माटेगावकर, मुग्धा कऱ्हाडे यांच्या आवाजात सर्व गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत. हा चित्रपट गुरुवारी, ४ नोव्हेंबरला दुपारी १२.०० वा. आणि सायंकाळी ७.०० वा. ‘शेमारू मराठीबाणा’वर प्रेक्षकांना पाहता येईल.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Popular all over the world movie baahubali will be released in marathi soon popular all over the world akp

ताज्या बातम्या