सोनी लीव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मध्यंतरी एक वेबसिरीज रिलीज झाली होती. ‘रॉकेट बॉईज’ नावाची ही सिरिज महान वैज्ञानिक होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांच्यावर जीवनावर बेतलेली आहे. या दोन्ही वैज्ञानिकांचं इस्रो आणि वैज्ञानिक क्षेत्रातलं योगदान आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील खासगी घडामोडींवर या सिरिजमधून प्रकाश टाकण्यात आला आहे. नुकताच या सिरिजच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सोनी लीव्हच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर त्यांनी हा टीजर पोस्ट केला आहे.


सिरिजच्या टीजरवरून हा नवा सीझन पोखरण अणू चाचणीवर बेतलेला असेल असं स्पष्ट होत आहे. टीजरमध्ये पोखरण अणू चाचणीची काही दृश्यं आपल्याला दिसतात. शिवाय होमी भाभा यांची भूमिका साकारणारा जीम सार्भ आणि विक्रम सारभाई यांची भूमिका साकारणारा इश्वाक यांची झलकही या टीजरमध्ये आपल्याला पाहायल मिळते. याबरोबरच इंदिरा गांधी आणि ए.पी.जे अब्दुल कलाम यांची झलकही आपल्याला दिसते. या सिरिजचा हा दूसरा सीझन या वर्षाअखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
Maylek Trailer released
Maylek Trailer: आई-मुलीच्या नात्याची भावनिक गोष्ट सांगणारा ‘मायलेक’चा ट्रेलर प्रदर्शित
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?

आणखीन वाचा : ‘रॉकेट बॉईज’च्या निमित्ताने..

‘रॉकेट बॉईज’च्या पहिल्या सीझनचं चांगलंच कौतुक झालं होतं. काही लोकांना ही सिरिज थोडी रटाळ वाटली होती. पण बहुतांश प्रेक्षकांनी या सिरिजचं कौतुकच केलं होतं. सिरिजमध्ये घेतलेल्या लिबर्टीवरून थोडंफार वातावरण तापलं होतं, पण त्याचा थेट परिणाम सिरिजवर झाला नाही. आता या दुसऱ्या सीझनचा टीजरही लोकांना आवडेल अशी शक्यता नाकारता येत नाही. शिवाय हा दूसरा सीझन पोखरण अणू चाचणीशी निगडीत असल्याने यात बऱ्यापैकी नाट्यदेखील आपल्याला बघायला मिळू शकते.