Porn Film Case : राज कुंद्राला २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

राज कुंद्राची चौकशी करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेला ७ दिवस द्यावे अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली होती.

Raj Kundra, Raj Kundra Arrest, police custody extension
राज कुंद्राची चौकशी करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने त्यांनी ७ दिवस मागितले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेस मॅन राज कुंद्राला अश्लील चित्रपटांच्या निर्मितीप्रकरणामध्ये १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. आज म्हणजे शुक्रवारी २३ जुलै रोजी राजला दुपारी एकच्या सुमारास भायखळा कारागृहातून न्यायालयात नेण्यात आले होते. त्याला आज जामीन मिळणार होती. मात्र, मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राला ७ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याची मागणी न्यायालयात केली. राज कुंद्राची चौकशी करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने ७ दिवस मागितले आहेत.

एवढंच नाही तर राज चौकशीत सहकार्य करत नसल्याचा आरोप मुंबई गुन्हे शाखेने केला आहे. राज पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देत नाही. या व्यतिरिक्त राज कुंद्रा पॉर्न चित्रपटाच्या व्यवसायाबद्दलचे अनेक प्रश्न टाळत आहे. सोबत मनी ट्रेलच्या संबंधीत प्रश्नांना देखील तो टाळत आहे. यामुळे मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला ७ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याची याचिका केली. यानंतर न्यायालयाने राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांना २७ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

काय आहे प्रकरण?

फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगल्यावर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

या प्रकरणात राज कुंद्रा मुख्य सूत्रधार असल्याचं दिसल्यानंतर त्याला १९ जुलै रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.  सुमारे ७ ते ८ तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी राज कुंद्राला पोलिसांकडून अटक करण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pornography raj kundra case police custody court mumbai police custody extension dcp