अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती बिझनेसमन राज कुंद्रा जवळ-जवळ २ महिन्यांनी जेलमधून बाहेर आला आहे. राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या. हे दोन महीने शिल्पा शेट्टीसाठी पण अत्यांत कठीण होते, या दरम्यान शिल्पाने अनेकदा तिच्या इन्स्टाग्रामवर मोटिवेशनल पोस्टा शेअर करताना दिसली आहे. राजच्या अटकेनंतर काही अठवड्यांनी शिल्पा शेट्टीने कामाला पुन्हा सुरूवात केली आणि ती या परिस्थितीन बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

नुकताच शिल्पाने इनस्टाग्राम स्टोरीवर पुस्तकातील एका पानाचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये ती या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगताना दिसली आहे. “असे म्हटले जाते की तुमचा कठीण काळच तुम्हाला स्ट्रॉंग बनवतो आणि आपण अडचणीतूनच शिकतो. हे खरे असू शकते मात्र कठीण काळ आपल्याला नाही तर कठीण काळातही काम केल्याने आपण स्ट्रॉंग होतो. दु:खात आपल्याकडे असलेल्या शाक्तींची जाणीव होते आणि हा कठीण काळ पुन्हा आला तर आपण याचा सामना करू शकतो.”, असे त्या पुस्तकात लिहिले होते.

shilpa shetty instagram story

राज कुद्राला जामीन मिळाल्यानंतर शिल्पाने तिच्या इन्स्टावर एक मोटिवेशनल पोस्टा शेअर केली होती. तसंच काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टी वैष्णव देवीला गेली होती. त्यावेळीस ती फॅन्स सोबत सेल्फी घेताना दिसली होती. तिचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. दरम्यान पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा हळूहळ पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करत आहे. शिल्पाने १३ वर्षांनंतर ‘हंगामा २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा एण्ट्री केली आहे. या चित्रपटात शिल्पासोबत परेश रावल, मीजान जाफरी आणि प्रणिता सुभाष मुख्य भूमिकेत दिसत आहेत. तर लवकरच शिल्पा इंडियाज गॉट टॅलेंट या शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसणार आहे.