कौतुकास्पद! प्रभासच्या ‘आदिपुरुष’मध्ये ‘हे’ मराठी कलाकार दिसणार, पाच भाषांमध्ये चित्रपट होणार प्रदर्शित | prabhas adhipurush movie poster release marathi actress tejaswini pandit and devdatta nage role in this film see details | Loksatta

कौतुकास्पद! प्रभासच्या ‘आदिपुरुष’मध्ये ‘हे’ मराठी कलाकार दिसणार, पाच भाषांमध्ये चित्रपट होणार प्रदर्शित

कौतुकास्पद! प्रभासच्या ‘आदिपुरुष’मध्ये ‘हे’ मराठी कलाकार काम करताना दिसणार, चित्रपट पाच भाषांमध्ये होणार प्रदर्शित

कौतुकास्पद! प्रभासच्या ‘आदिपुरुष’मध्ये ‘हे’ मराठी कलाकार दिसणार, पाच भाषांमध्ये चित्रपट होणार प्रदर्शित
कौतुकास्पद! प्रभासच्या ‘आदिपुरुष’मध्ये 'हे' मराठी कलाकार काम करताना दिसणार, चित्रपट पाच भाषांमध्ये होणार प्रदर्शित

अभिनेता प्रभासचा आगामी चित्रपट ‘आदिपुरुष’ सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाची जिथपासून घोषणा करण्यात आली अगदी तिथपासूनच चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरील प्रभासचा लूक विशेष लक्षवेधी ठरत आहे. या चित्रपटामध्ये तो भगवान राम यांची भूमिका साकारताना दिसेल. त्याचबरोबरीने कौतुकाची गोष्ट म्हणजे मराठमोळ्या कलाकारांचं या चित्रपटाशी नाव जोडलं गेलं आहे.

आणखी वाचा – “ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का?” ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा बोल्ड प्रोमो पाहून नेटकरी संतापले

हातात धनुष्यबाण घेतलेला प्रभासचा या पोस्टरवरील लूक सध्या चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये सैफ अली खान, क्रिती सेनॉन यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. तसेच आता या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या मराठमोळ्या कलाकारांची नावं देखील समोर आली आहेत. मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित तसेच अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटामध्ये काम करताना दिसतील.

तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत आमचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असल्याचं म्हटलं आहे. तिची पोस्ट पाहता सेलिब्रिटी मंडळींनी तिला या चित्रपटासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच देवदत्तनेदेखील चित्रपटाचे पोस्टर शेअर करत आपण या चित्रपटामध्ये काम करत असल्याची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे.

आणखी वाचा – Bhediya Teaser : वरुण धवनच्या ‘भेडिया’चा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

तेजस्विनी व देवदत्त या दोघांचंही सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुक होत आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम व कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होईल. करोनाकाळामध्ये ओम राऊतने या चित्रपटावर काम केलं. पुढील वर्षी १२ जानेवारीला चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अक्षय कुमार झाला हृतिक रोशनच्या आलिशान घराचा मालक?

संबंधित बातम्या

“एकाही व्यक्तीने मी खोटं सांगितल्याचं सिद्ध केलं तर…”, विवेक अग्निहोत्री यांची मोठी घोषणा, म्हणाले “आता मी काश्मीर फाइल्सचा…”
बहुचर्चित ‘अवतार २’ केरळमध्ये होणार नाही रिलीज; चित्रपटगृहाच्या मालकांचा मोठा निर्णय, ‘हे’ आहे कारण
“पुष्पानंतर आता…” अल्लू अर्जुनला आवाज देणाऱ्या मराठमोळ्या श्रेयस तळपदेचा मुलाखतीदरम्यान खुलासा
नीना गुप्तांचा वर्कआउट बघून व्हाल थक्क; व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, “ही तर सुरवात…”
“तो माझ्यापेक्षा वयाने…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले उघडपणे भाष्य

व्हिडिओ

ताज्या बातम्या
UP Accident: बहराइचमध्ये ट्रकची बसला धडक, भीषण दुर्घटनेत सहाजणांचा मृत्यू, चौघांची प्रकृती गंभीर
Maharashtra News Live : राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
Video: सून भाजपाची उमेदवार, पण रवींद्र जाडेजाच्या वडिलांचा काँग्रेससाठी प्रचार; व्हिडीओ व्हायरल!
The Kashmir Files Controversy: “नदाव लॅपिड म्हणजे इस्त्रायलमधले जितेंद्र आव्हाड”
“मराठी कलाकारांना कधीच जास्त प्रसिद्धी मिळत नाही, त्याउलट…” अभिजीत सावंतचे स्पष्ट वक्तव्य