प्रभासने पूजा हेगडेला वाढदिवशी दिले खास गिफ्ट

प्रभास आणि पूजा ‘राधे श्याम’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडेचा आज १३ ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. ती लवकरच दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या ‘राधे श्याम’ या चित्रपटात भूमिका साकारणार आहे. नुकताच प्रभासने पूजाला वाढदिवसानिमित्त एक खास भेट दिली आहे.

प्रभासने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पूजाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो म्हणजे पूजाचा ‘राधे श्याम’ या चित्रपटातील फर्स्ट लूक आहे. तसेच हा फोटो शेअर करत त्याने या चित्रपटात पूजाचे नाव प्रेरणा आहे असे सांगितले आहे.

पूजाचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटमध्ये तिने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच फोटो पाहून ती प्रवास करताना दिसत आहे. प्रवासादरम्यान तिच्या समोर एक व्यक्ती बसलेली असून पूजा त्या व्यक्तीकडे बघून हसताना दिसत आहे.

राधे श्याम या चित्रपटात एक लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे. टी-सीरिज या चित्रपटाची निर्मिती करत आहे. तसेच तेलुगू दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट एक बिग बजेट असणार असून २०२१मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तामिळ आणि मल्याळम अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पूजा आणि प्रभास सोबतच भाग्यश्री, मुरली शर्मा, सचिन खेडेकर, प्रियदर्शी, साशा छेत्री, कुणाल रॉय कपूर आणि सथ्यन हे कलाकार देखील दिसणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Prabhas best gift for pooja hegade avb

Next Story
पं. मनोहर चिमोटे
ताज्या बातम्या