पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रभास सरसावला, मुख्यमंत्री निधीत दान केली ‘इतकी’ रक्कम

करोना काळात प्रभासने गरजूंच्या मदतीसाठी एक मोठी रक्कम दान केली होती.

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास हा अभिनेता आता चाहत्यांसाठी नवीन राहिलेला नाही. ‘बाहुबली’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रभास घराघरात पोहोचला. प्रभास हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. करोना काळात प्रभासने गरजूंच्या मदतीसाठी एक मोठी रक्कम दान केली होती. यानतंर पुन्हा एकदा प्रभासने पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. नुकतंच प्रभासने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत कोट्यावधी रुपये दान केले आहे.

प्रभासने आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपये दान दिले आहेत. काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे राज्यात काही ठिकाणी वाईट स्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळेच त्याने हे पैसे दान म्हणून दिले आहेत. विशेष म्हणजे कोविड काळातही त्याने गरजूंच्या मदतीसाठी ४.५ कोटी रुपयांची देणगी दिली होती.

प्रभासने आंध्रप्रदेशातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मोठी देणगी दिली आहे. याबद्दल सर्वत्र कौतुक केले जाते आहे. प्रभाससह राम चरण, महेश बाबू, ज्युनियर एनटीआर, अल्लू अर्जुन यांसारख्या कलाकारांना मोठी रक्कम दान केली आहे.

विकी-कतरिनाच्या लग्नात राजस्थानच्या ‘या’ ठिकाणाहून आली मेहंदी, तयारीसाठी लागले इतके दिवस

दरम्यान, प्रभास सध्या त्याच्या ‘राधेश्याम’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत पूजा हेगडे स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकतेच त्याने ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. सध्या प्रभास ‘प्रोजेक्ट के’ आणि ‘सालार’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Prabhas donates rs 1 crore to andhra pradesh cm relief fund for flood victims nrp