चाहत्यांना माझ्याकडून ‘ही’ अपेक्षा- प्रभास

प्रभासचा आणखी एक चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे

prabhas
प्रभास

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला दिग्दर्शक राजामौली यांचा ‘बाहुबली’ हा चित्रपट केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नाही तर जगभरात प्रसिद्ध झाला होता. चित्रपटातील सुपरस्टार प्रभासच्या भूमिकेची जगभरात जोरदार चर्चा देखील झाली होती. आता प्रभासने बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करावे अशी इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली आहे. चाहत्यांची ही इच्छा प्रभास लवकरच पूर्ण करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. प्रभासचा ‘साहो’ चित्रपट ‘बाहुबली’ चित्रपटाप्रमाणेच हिंदीमध्ये प्रदर्शित करणार आहे.

प्रभासचा आणखी एक चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित होणार असल्यामुळे त्याने आनंद व्यक्त केला आहे. याआधी त्याचा ‘बाहुबली’ हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित झाला होता. ‘साहो’ चित्रपटाबद्दल प्रभास सांगतो की, ‘बाहुबली चित्रपटानंतर चाहत्यांना मला अॅक्शन चित्रपटात पाहण्याची इच्छा आहे. पण साहो हा एक स्क्रिनप्ले आहे. या चित्रपटाच्या कथेसाठी सुजीत आणि त्याच्या टीमने ३ वर्ष काम केले आहे.’

‘साहो’मधील साहसदृश्यांसाठी हॉलिवूडमधील ५० लोकांची एक टीम भारतात बोलावण्यात आली आहे. ही टीम प्रभासला अ‍ॅक्शन सीनसाठी प्रशिक्षित करणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी असलेल्या ५० लोकांनी अनेक हॉलिवूड चित्रपटांसाठी काम केले आहे. ‘साहो’मध्ये प्रभास आणि श्रद्धासोबतच नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट हिंदी, तेलुगू आणि तमिळ या भाषांमध्ये शूट केला गेला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Prabhas says i feel people like to see me in action movies

ताज्या बातम्या