प्रभासच्या ‘सालार’ सिनेमाबाबत निर्मात्यांनी केली मोठी घोषणा, स्वातंत्र्य दिनी होणार खुलासा

आता या नवीन अपडेटमुळे सालारविषयी उत्सुकता आणखी वाढली असल्याचं पाहायला मिळत आहे.

प्रभासच्या ‘सालार’ सिनेमाबाबत निर्मात्यांनी केली मोठी घोषणा, स्वातंत्र्य दिनी होणार खुलासा
प्रभास

दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता प्रभास आणि त्याच्या सिनेमाची अनेक चाहते अगदी आतुरतेने वाट बघत असतात. बाहुबली नंतर प्रभासच्या नावाचा ब्रँड तयार झाला आहे आणि त्याच्या या लोकप्रियतेचा बऱ्याच निर्मात्यांनी फायदा करून घ्यायचा प्रयत्न केला. बाहुबलीनंतर साहो आणि राधे श्यामसारख्या बिग बजेट सिनेमात प्रभास आपल्याला दिसला, पण बाहुबलीसारखं यश या सिनेमांना लाभलं नाही. मराठी दिग्दर्शक ओम राऊत याच्या आगामी आदिपुरुष या सिनेमातही प्रभास मुख्य भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. त्याबरोबरच सैफ अली खान, क्रीती सनन हेदेखील यात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पण आता प्रभासचे चाहते त्याच्या आगामी ‘सालार’ या सिनेमासाठी उत्सुक असल्याचं चित्र दिसत आहे.

नुकतंच हॉम्बल फिल्म्सच्या अधिकृत फेसबूकवर प्रभासच्या सालारविषयी नवीन अपडेट देण्यात आली आहे. येत्या १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर सिनेमाविषयी मोठी घोषणा होणार असल्याचं या पोस्टमध्ये म्हणण्यात आलं आहे. गेले कित्येक दिवस प्रभास फॅन्स त्याच्या या सिनेमाच्या टिझरची वाट बघत आहेत. आता या नवीन अपडेटमुळे सालारविषयी उत्सुकता आणखी वाढली असल्याचं पाहायला मिळत आहे.
“मी भारतीय आहे आणि…”, कॅनेडियन नागरिकत्वावरुन टीका करणाऱ्यांना अक्षय कुमारचे सडेतोड उत्तर

येत्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाचे निमित्त साधून दुपारी १२.५८ या वेळी या सिनेमाबाबत मोठी घोषणा होणार आहे, असं या पोस्टरमध्ये म्हटलं आहे. एकंदर सालारच्या पोस्टरवरून आणि प्रभासच्या लूकवरून हा एक अॅक्शनपट असल्याचं स्पष्ट होत आहे. दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री श्रुती हासनदेखील या सिनेमात आपल्याला दिसणार आहे.

“सोशल मीडियामुळे कलाकारांचे स्टारडम…” करण जोहरचे वक्तव्य चर्चेत

सर्वात सुपरहिट ठरलेल्या KGF chapter 2 आणि त्याआधीच्या भागाचं दिग्दर्शन करणारे प्रशांत नील हेच प्रभासच्या सालारचंही दिग्दर्शन करणार आहेत. यामुळेच चाहत्यांना या सिनेमाविषयी इतकी उत्सुकता आहे. प्रभासचा हा सालार सिनेमा KGF युनिव्हर्सशी जोडला जाणार आहे. याविषयी दिग्दर्शक प्रशांत निल यांनी काहीच स्पष्टीकरण दिलेलं नाही. KGF प्रमाणेच सालारसुद्धा पॅन इंडिया लेव्हलवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या रिलीज डेटविषयी अजूनही काहीच खुलासा झालेला नाही.

या सिनेमाच्या निर्मात्यांच्या मते हा सिनेमा २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. त्याशिवाय शिवाय या सिनेमातही बाहुबलीप्रमाणे प्रभासची दुहेरी भूमिका असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prabhas starrer film salaar makers will announce big information about film on 15 august avn

Next Story
ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर कॉमेडियन राजू श्रीवास्तवची तब्येत खालावली, मोदींकडून मदतीचा हात
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी