वाढदिवशी प्रभासने चाहत्यांना दिली खास भेट, बहुचर्चित ‘राधे श्याम’चा नवा टीझर प्रदर्शित

चित्रपटातील प्रभासचा नवा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

radhe shyam teaser, prabhas, prabhas birthday, radhe shyam, radhe shyam movie, radhe shyam release date,

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा आज २३ ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत प्रभास त्याचा ४२वा वाढदिवस साजरा करणार आहे. दरम्यान, प्रभासने चाहत्यांना एक भेट दिली आहे. त्याने आगामी चित्रपट ‘राधे श्याम’चा नवा टीझर शेअर केला आहे. हा टीझर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चित्रपटात प्रभाससोबत अभिनेत्री पूजा हेगडे दिसणार आहे.

प्रभासने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘राधे श्याम’चा टीझर शेअर केला आहे. या १ मिनिटे १८ सेकंदाच्या टीझरमध्ये अभिनेत्री पूजा हेगडेची देखील झलक पाहायला मिळाली. टीझरमध्ये प्रभास एकदम वेगळ्या अंदाजात दिसत आहे त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.
आणखी वाचा: ‘कशा असतात ह्या बायका’, तेजश्री प्रधान एका वेगळ्या भूमिकेत येणार प्रेक्षकांच्या भेटीला

चित्रपटाची पहिली घोषणा झाल्यापासून चाहते प्रभास आणि पूजाचा रोमांस पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ‘राधे-श्याम’ हा चित्रपट राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित बहुभाषिक चित्रपट आहे. गुलशन कुमार आणि टी-सीरिज याचे सादरीकरण करणार आहेत. या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे मुख्या भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे. हा चित्रपट जानेवारी २०२२मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Prabhas treats his fans with radhe shyam teaser avb

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या