Nidhi Agarwal Viral Video : लोकप्रिय अभिनेत्री अभिनेत्री निधी अग्रवालबरोबर धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रभासची हिरोईन निधी अग्रवाल ‘द राजा साब’ चित्रपटातील ‘सहना सहना’ या गाण्याच्या लाँचिंग इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. तिथून बाहेर पडताना त्याच्याबरोबर जे घडलं ते पाहून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

निधी अग्रवालला इव्हेंटमधून परतताना गर्दीने वेढलं. लोकांनी तिच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी तुफान गर्दी केली. या गर्दी निधी अक्षरशः अडकली होती. गर्दी ती दिसत नव्हती, इतक्या लोकांनी तिच्याभोवती गराडा घातला होता. बॉडीगार्ड असतानाही निधीबरोबर हा प्रकार घडला. गर्दीने तिला धक्काबुक्की केली. बॉडीगार्ड गर्दीला अडवण्याचा प्रयत्न करत होते, पण लोक तिला स्पर्श करत होते आणि सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होते. निधीने ऑफ शोल्डर ड्रेस घातला होता, तो ड्रेस कसाबसा सावरत ती गाडीपर्यंत पोहोचली. नंतर बॉडीगार्डने तिला गाडीत बसवलं.

सोशल मीडियावर निधी अग्रवालचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत निधी प्रचंड अस्वस्थ दिसत आहे. निधी अग्रवालचा गल्टने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून लोक संताप व्यक्त करत आहेत.

निधी अग्रवालचा व्हिडीओ व्हायरल

द राजा साबच्या इव्हेंटमध्ये निधी अग्रवालबरोबर घडलेला प्रकार धक्कादायक आहे. ‘चाहत्यांनी मर्यादा पाळायला हव्या, कार्यक्रमाचं ठिकाण हा प्रॉब्लेम आहे,’ ‘मोठ्या प्रमाणात लोक होते आणि चाहते तिला पाहायला उत्सुक होते त्यामुळे हे सगळं घडलं,’ ‘थोडी लाज वाटू द्या, ती किती अनकंफर्टेबल आहे हे व्हिडीओत दिसतंय.. तुम्ही तिचे चाहते नाहीत,’ ‘हे पाहून प्रचंड वाईट वाटतंय, सेलिब्रिटींना आदर द्यायला हवा,’ अशा कमेंट्स निधी अग्रवालच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी केल्या आहेत.

nidhi agarwal mobbed video 1
व्हिडीओवरील कमेंट्स
nidhi agarwal mobbed video 2
व्हिडीओवरील कमेंट्स

प्रत्यक्षदर्शींच्या मते, गर्दी इतकी वाढली होती की काही काळ परिस्थिती हाताबाहेर गेल्यासारखं वाटत होतं. तेथील सुरक्षा पथकाला अभिनेत्रीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. चाहत्यांनी सेल्फी आणि ऑटोग्राफसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होत गेली.

कोण आहे निधी अग्रवाल?

निधी अग्रवालने करिअरची सुरुवात ‘मुन्ना मायकल’मधून केली. यात टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत होता. नंतर ती दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीत गेली. तिथे तिने ‘आयस्मार्ट शंकर’, ‘ईश्वरन’, ‘हरि हारा वीरा मल्लु’ या सिनेमांमध्ये काम केलं.

मारुती दिग्दर्शित, ‘द राजा साब’ ९ जानेवारी, २०२५ रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात प्रभास आणि निधी अग्रवालबरोबर संजय दत्त, मालविका मोहनन आणि रिद्धी कुमार यांच्याही भूमिका आहेत.