साहित्य अकादमी युवा पुरस्कारावर ‘देवबाभळी’ची छाप; प्राजक्त देशमुख ठरले मानकरी

प्राजक्त यांचं संगीत देवबाभळी हे नाटकही फार प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठरलं आहे. 

साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या साहित्य अकादमी युवा पुरस्काराचे २०२० सालचे मानकरी ठरले आहेत मराठमोळे लेखक, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख. त्यांच्या देवबाभळी या पुस्तकासाठी प्राजक्त यांना हा सन्मान मिळाला आहे. प्राजक्त यांचं संगीत देवबाभळी हे नाटकही फार प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठरलं आहे.

दरवर्षी साहित्य अकादमी युवा पुरस्कार हा ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लेखकांना त्यांच्या पुस्तकासाठी प्रदान करण्यात येतो. ताम्रपत्र तसंच ५०,००० रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. २०२० चा हा पुरस्कार प्राजक्त देशमुख यांना मिळाला आहे. मराठीसोबतच बंगाली साहित्यासाठीचे पुरस्कारही जाहीर करण्यात आले. बंगाली लेखक श्याम बंद्योपाध्याय यांच्या पुराणपुरूष या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

या पुरस्कारासाठी तज्ज्ञांच्या त्रिसदस्यीय समितीने काम पाहिले. या समितीमध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचाही समावेश आहे. त्यांच्यासोबतच आशा बागे आणि लक्ष्मीकांत देशमुख या तज्ज्ञांनीही या पुरस्कारासाठी काम पाहिलं.

प्राजक्त यांच्या देवबाभळी या पुस्तकाला आत्तापर्यंत ३९ पुरस्कारांनी सन्मानित कऱण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारचा विजय तेंडुलकर पुरस्कारही प्राजक्त यांना मिळालेला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Prajakt deshmukh got sahitya akedami 2020 award for devbabhali vsk

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या