‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत प्राजक्ताने महाराणी येसूबाई ही भूमिका साकारली होती. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्राजक्ताचं फॅन फॉलोइंगसुद्धा मोठं आहे. रोजच्या जीवनातील विविध घडामोडी प्राजक्ता चाहत्यांसोबत शेअर करत असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तम अभिनयशैली आणि गोजिरवाणा चेहरा यांच्या जोरावर प्राजक्ता आज विशेष लोकप्रिय आहे. तिच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. प्राजक्ताही चाहत्यांशी अनेक नवनवीन गोष्टी शेअर करत असते. आपल्या कामाच्या जोरावर मनोरंजन सृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्राजक्ताला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.

आणखी वाचा : Video: प्राजक्ता गायकवाडने खरेदी केलं नवीन घर, गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

सध्या ती ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यात महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारत आहे. नुकतेच या नाटकाचे प्रयोग संभाजीनगर येथे संपन्न झाले. ह्या दरम्यान तिला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालं. हाच अनुभव तिने तिच्या पोस्टमधून शेअर केला आहे.

हेही वाचा : “आता पूर्णविराम देण्याची वेळ आलीये…” म्हणणाऱ्या सुव्रत जोशीचे पत्नी सखी गोखलेने मानले आभार, म्हणाली…

प्राजक्ताने तिचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला. व्हिडीओत चाहत्यांमध्ये मिसळून त्यांच्याबरोबर वेळ घालवताना दिसत आहे. कुणी तिला पिठलं भाकरी भरवत आहे, तर कोणी तिला भेटवस्तू देत आहे. चाहत्यांच्या या प्रेमाने भारावून गेलेल्या प्राजक्ताने लिहिलं, “गेले आठ दिवस छत्रपती संभाजी नगरमध्ये आहे… कुणी प्रेमाने चुलीवरच्या भाकरी करून आणल्या.. तर कुणी थालीपीठं… शेतातल्या तुरीच्या शेंगा उकडून आणल्या.. चॉकलेट्स पण दिल्या… इथला प्रसिद्ध असा पदार्थ भल्लासुद्धा टेस्ट केला…छत्रपती संभाजी नगरकरांच्या या प्रेमासाठी शब्दसुद्धा अपुरे आहेत. खरंतर या प्रेमामुळेच पोट भरतं.” तिच्या या पोस्टवर तिचे चाहतेही भरभरून कमेंट्स करत तिचं कौतुक करत आहेत. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prajakta gaikwad shared her experience of her new marathi play rnv
First published on: 28-12-2022 at 12:34 IST