प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूप सक्रीय असते आणि तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी ती शेअर करत असते. अशताच आता अभिनेत्रीने तिच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. यामधून ती भातशेती करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
प्राजक्ता माळीला निसर्गाची खूप आवड असून तिचं निसर्गाच्या सानिध्यात एक मोठं फार्म हाऊसही आहे. अशातच आता भात लावणी करतानाचे तिचे जवळच्या माणसांबरोबरचे फोटो तिने पोस्ट केले आहेत. अभिनेत्री यावेळी तिच्या शेतामध्ये भात लावणी करताना पाहायला मिळत आहे. या पोस्टला तिने छान कॅप्शन दिली आहे.
प्राजक्ता माळीने केली भात लावणी
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टला प्राजक्ता माळीने “शेतकरी प्रमाणपत्र आहेच, त्याला वाढदिवसाला जागले, भात शेतीत (इंद्रायणी) तासभर राबलो.. श्रमदान” अशी कॅप्श्न दिली आहे, “बेस्ट बर्थ डे मेमरी” असंही म्हटलं आहे. प्राजक्ता यावेळी स्वत: भाताची लावणी करत असून यामधून तिने तासभर शेतात राबल्याची माहिती यामधून दिलं आहे. प्राजक्ताने आठ ऑगस्ट रोजी झालेल्या तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केली आहे. यामधून तिने तिचा वाढदिवस कसा साजरा केला याची झलक दाखवली आहे.
प्राजक्ताने यापूर्वीसुद्धा तिच्या गावातील यात्रेला गेल्याचे फोटो शेअर केले होते. अभिनेत्री अनेकदा तिच्या कुटुंबीयांबरोबरचेही सण साजरे करतानाचे फोटो शेअर करत असते. प्राजक्ता कितीही मनोरंजनविश्वातील ग्लॅमरस दुनियेत जगत असली तरी ती तिची संस्कृती, मातीशी असलेलं नातं विसरली नसल्याने तिचे चाहतेही तिचं कौतुक करत असतात. या व्हिडीओखालीसुद्धा अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे.
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूप सक्रीय असते आणि तिच्या नवीन प्रोजेक्टबद्दल, खासगी आयुष्यातील घडामोडींबद्दल माहिती देत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. प्राजक्ता अनेकदा यासह योगा व फिटनेस संदर्भातील व्हिडीओसुद्धा शेअर करत असते.
दरम्यान, प्राजक्ताच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर अभिनयासह प्राजक्ता आता निर्मिती क्षेत्रातही सक्रीय असून यासह तिचा स्वत:चा व्यवसायसुद्धा ती पाहत आहे. तिची निर्मिती असलेल्या ‘फुलवंती’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. येत्या काळातही ती तिची निर्मिती असलेल्या कलाकृतीमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
