मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. सोशल मीडियावर तिचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे अनेकदा तिच्या पोस्ट व्हायरल होताना दिसतात. प्राजक्ता माळी अभिनेत्री असली तरीही राजकारणातील तिची रुची कोणापासून लपून राहिलेली नाही. ती अनेकदा राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसते. अशावेळी तिच्या पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. आताही तिनं शेअर केलेली फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

प्राजक्ता माळीनं नुकतीच राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या निमित्तानं घेतलेल्या सभेला हजेरी लावली होती. यावेळचे काही व्हिडीओ फेसबुक शेअर करत प्राजक्ताने त्यासोबत एक पोस्टही लिहिली आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान राज ठाकरे यांची ही सभा सध्या महाराष्ट्रातही चर्चेचा मुद्दा ठरताना दिसतेय.

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
२०१९ ते २०२४ मोदींचा मराठवाड्यातील पट पूर्णपणे बदलला !
Prime Minister Modi asserted that the gaming industry does not need regulation
‘गेमिंग उद्याोगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या गेमर्सशी संवाद
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

आणखी वाचा- Video : अंकिता लोखंडे आहे प्रेग्नन्ट? कंगनाच्या शोमध्ये अभिनेत्रीनं उघड केलं गुपित

प्राजक्ता माळीने राज ठाकरे यांच्या सभेचे व्हिडीओ फेसबुकवर शेअर करताना लिहिलं, ‘नाही नाही… कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नाही. काल आयुष्यात पहिल्यांदा राजकीय सभा अनुभवली (खूप दिवसांपासून अनुभवायचीच होती..) ते फक्त तुमच्याबरोबर शेअर करतेय… इतकाच हेतू. कलाकार नंतर, आधी मी माणूस- सामाजिक प्राणी आहे; त्याच्या समृद्धी करता पण झटायला हवं. म्हणून हा घाट. (आता माझ्या आधार कार्ड वर मुंबईचा पत्ता आहे.)’

प्राजक्ता माळीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेकदा ती राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसते. राज ठाकरे यांनी शिवजी पार्क येथे गुढीपाडव्यानिमित्त मेळावा घेतला होता. त्यांच्या या राजकीय सभेत प्राजक्ता माळीला पाहून प्राजक्ता मनसेमध्ये प्रवेश करते की काय अशा चर्चा होत्या. मात्र प्राजक्तानं सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.