अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. तिची ‘रानबाजार’ ही वेबसीरिज सुपरहिट ठरली. वेबसीरिजमुळे चर्चेत राहिलेल्या प्राजक्ताचा ‘वाय’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. मराठीमधील या थरारपटाला प्रेक्षकांचा बराच प्रतिसाद मिळत आहे. याच चित्रपटाच्यानिमित्ताने प्राजक्ताने आपल्या कुटुंबियांचं कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – VIDEO : घटस्फोटाच्या निव्वळ अफवा?, सिद्धार्थने शेअर केलेल्या लेकीच्या डान्स व्हिडीओमध्ये दिसली पत्नी तृप्ती

‘वाय’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि तिथपासूनच चित्रपटाची चर्चा रंगत होती. स्त्रीभ्रूण हत्या, गर्भपात, गर्भलिंग निदान यांसारख्या नाजूक विषयावर आधारित हा चित्रपट आहे. प्राजक्ता-मुक्ताने या चित्रपटामध्ये साकारलेल्या भूमिकेचं देखील बरंच कौतुक होताना दिसत आहे. आपल्या कुटुंबामध्ये स्त्रीयांना किती महत्त्व दिलं जातं? याबाबत प्राजक्ताने सांगितलं आहे.

प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत
प्राजक्ताने आपल्या कुटुंबियांचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत असताना तिने म्हटलं की, “आई-पप्पा तुमचे किती आणि कसे आभार मानू? आम्हा मुलींच्या जन्माचं तुम्ही फक्त स्वागत नाही तर सोहळा केलात. चित्रपट पोचला पाहिजे, जीव वाचला पाहिजे.” मुलींना जगू द्या अशा प्रकारचा संदेश देण्याचा प्राजक्ताने प्रयत्न केला आहे.

आणखी वाचा – “आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेचा चमत्कार बघा”; एकनाथ शिंदे गटाच्या याचिकेनंतर किरण मानेंचा संताप

प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे आई-वडील, भाच्या आणि घरातील इतर मंडळी दिसत आहेत. आपल्याकडे स्त्रीभ्रूण हत्या, गर्भलिंग निदान करणं कायद्याने गुन्हा आहे. पण अजूनही कुठेतरी बहुदा अशाप्रकारच्या घटना घडत असतील. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या याच घटनांवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे अगदी वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न दिग्दर्शक-लेखक अजित वाडीकर यांनी केला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prajakta mali share post on instagram related to save girl child with her family photo says thanks to mother father kmd
First published on: 28-06-2022 at 16:22 IST