अभिनेत्री प्राजक्ता माळी आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. प्राजक्ताच्या आगामी तेलुगू चित्रपटाचं चित्रीकरण सध्या सुरू आहे व तो याच वर्षी प्रदर्शित होईल. या चित्रपटाची कथा, कलाकारांची फळी आणि प्राजक्ताची भूमिका याविषयीची अधिक माहिती लवकरच आपल्यासमोर येईल, असं प्राजक्ता म्हणाली.
प्राजक्ता या चित्रपटात नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार, तिचा लूक कसा असेल आणि ती कोणत्या कलाकारांसोबत झळकणार, याबाबत चाहत्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे. मराठी मनोरंजन विश्वात यशस्वी वाटचाल केल्यानंतर आता तेलुगू चित्रपटसृष्टीतील तिच्या नव्या प्रवासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठी मालिकांपासून चित्रपटांपर्यंत अनेक संस्मरणीय भूमिका साकारत प्राजक्ताने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिच्या सहजसुंदर अभिनयशैलीमुळे आणि विविधांगी व्यक्तिमत्त्वामुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. आता ती दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप उमटवण्यासाठी सज्ज असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे.