प्राजक्ताचा सफरनामा;तिबेटीयन थाळीवर मारला ताव

अमृताचा प्राजक्ताला सल्ला

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या हिमाचल प्रदेशच्या निसर्गात मनसोक्त फिरण्याचा आनंद लुटतेय. शुटींगच्या धावपळीतून वेळ काढून प्राजक्ता हिमाचल प्रदेशला फिरण्यासाठी गेली आहे. विशेष म्हणजे यावेळीदेखील ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा पूरेपुर प्रयत्न करत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणाचे फोटो सोशल मिडियावरुन शेअर करत ती चाहत्यांसोबत शेअर करत आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये भ्रमंतीसाठी गेलेल्या प्राजक्ताने येथील काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने तिबेटीयन थाळीचा आस्वाददेखील घेतल्याचं पाहायला मिळत आहे. हे संपूर्ण ताट मी एकटीनं संपवलं नाही, असं मजेशीर कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

 

प्राजक्ता माळीनं शेअर केलेल्या फोटोत लज्जतदार पदार्थांनी भरलेलं ताट दिसतंय. हे पदार्थ पाहून कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. प्राजक्ताच्या या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंटदेखील केली आहे. यात ‘प्राजू कंट्रोल’ अशी मजेशीर कमेंट अमृता खानविलकरने केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Prajkta mali having fun in himachal pradesh kw24 ssj

ताज्या बातम्या