‘आलिया एक चांगली अभिनेत्री आहे’, प्रकाश झा यांचे ‘सडक २’ डिसलाइकवर वक्तव्य

त्यांनी एका मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केले आहे.

बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट्ट यांचा लवकरच ‘सडक २’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात संजय दत्त, पूजा भट्ट, आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. पण चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच यूट्यूबवर पहिल्या २४ तासांमध्ये सर्वाधिक डिसलाइक मिळालेला ट्रेलर ठरला आहे. आता यावर चित्रपट निर्माते प्रकाश झा यांनी वक्तव्य केले आहे.

नुकतीच प्रकाश झा यांनी ‘बॉलिवूड लाइफ’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी ‘सडक २’ चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेल्या डिसलाइक विषयी वक्तव्य केले. ‘आलिया भट्ट ही एक चांगली अभिनेत्री आहे आणि महेश भट्ट सर एक चांगले दिग्दर्शक आहेत ही गोष्ट कोणी नाकारु शकत नाही. त्यांनी अनेक हिट चित्रपट केले आहेत. पण सडक २ च्या बाबतीत काय सुरु आहे? हा सर्वात जास्त डिसलाइक मिळालेला ट्रेलर ठरला आहे कारण जर तुम्हाला असे वाटते की भट्ट यांचा संबंध सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाशी आहे तर हे चुकीचे आहे आणि अयोग्य देखील’ असे प्रकाश झा यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘सडक २’मधील नवे गाणे प्रदर्शित, मिळाले पुन्हा डिसलाइक

दरम्यान त्यांनी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरही वक्तव्य केले. ‘सुशांत एक चांगला अभिनेता होता. स्वत:ला सिद्ध करुन दाखवण्यासाठी मुंबईमध्ये आल्यावर तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. अनेक वेळा नकारालाही समोरे जावे लागते. त्यानंतर मेहनत करुन तुम्हाला काम मिळाले तर तुम्ही चमकता. आणि हिच या जगाची सुंदरता आहे’ असे प्रकाश झा पुढे म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Prakash jha feels alia bhatt is a fantastic actress avb

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या