प्रार्थना बेहेरेने तिच्या वडिलांच्या वर्षश्राद्धानिमित्त भावुक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने वडिलांना जाऊन एक वर्ष झालं, पण ती आजही त्यांची वाट पाहत आहे असं म्हटलं आहे. प्रार्थनाने यावेळी तिच्या वडिलांबरोबरचे आणि आई व मोठ्या बहिणीबरोबरचे फोटो शेअर केले आहेत.

प्रार्थनाची भावुक पोस्ट

इन्स्टाग्रामवर वडिलांबरोबरचे फोटो शेअर करत प्रार्थना म्हणाली, “एक वर्ष झालं बाबा… पण मन आजही तुमची वाट पाहतंय.बाबा, तुमचं जाणं आम्हाला खूप काही शिकवून गेलं, पण तुमच्याशिवाय जगणं कधीच शिकवू शकलं नाही. तुमच्या आठवणी आमची ताकद आहेत, आणि तुमचे संस्कार आमची ओळख. तुम्ही दिसत नाही, पण प्रत्येक क्षणी आमच्याबरोबर आहात. तुम्ही आमचं आभाळ होता, बाबा…
आणि आभाळ कधीच हरवत नाही. तुमच्या पहिल्या वर्षश्राद्धानिमित्त विनम्र श्रद्धांजली. खूप आठवण येते बाबा.”

प्रार्थनाच्या या पोस्टखाली तिच्या अनेक कलाकार मित्र-मैत्रिणींनी कमेंट्स केल्या आहेत. तर तिच्या चाहत्यांनीही कमेंट्स करत तिचं सांतवन केलं आहे. अभिनेत्री अनेकदा तिच्या वडिलांच्या आठवणीत पोस्ट, व्हिडीओ शेअर करत असते. वडिलांच्या निधनाने तिला धक्का बसला असून अजूनही वडिलांशिवाय जगणं तिच्यासाठी सोप नसल्याचं तिच्या पोस्ट, व्हिडीओमधून जाणवतं.

प्रार्थना बेहेरेची इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, इन्स्टाग्राम स्टोरीवरही तिने वडिलांच्या वर्षश्राद्धानिमित्त व्हिडीओ शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.