scorecardresearch

प्रार्थना बेहरे ‘या’ मालिकेतून करणार मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण

प्रार्थना चक्क ११ वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिकेत दिसणार आहे.

प्रार्थना बेहरे ‘या’ मालिकेतून करणार मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण
प्रार्थनाने हिंदी टेलिव्हिजनमधून आपल्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली.

हिंदी टेलिव्हिजनमधून आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. प्रार्थना चक्क ११ वर्षांनी झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या आगामी मालिकेतून मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण करणार आहे. अनेक चित्रपट आणि मालिकांतून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची भुरळ पाडणारी प्रार्थना आता मराठी टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे यामुळे प्रेक्षक चाहत्यांची उत्सुकता शिगेला गेली आहे.

प्रार्थनाने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमावरही प्रार्थना बरीच अॅक्टिव्ह असून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. परंतू, गेली दोन वर्ष प्रार्थना मोठ्या पडद्यापासून दूर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना भेटताना आनंद होत असल्याचं प्रार्थना म्हणते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prarthana (@prarthana.behere)

पुन्हा मालिकेमध्ये पदार्पण करण्याबद्दल प्रार्थना म्हणते, “मला गेली अनेक वर्ष खूप मालिकांच्या ऑफर आल्या. परंतु, तेव्हा मी फक्त चित्रपट करायचं ठरवलं होतं. मी जाणूनबुजून मालिकांना नकार देत गेले. परंतु, आता जवळपास दोन वर्ष माझा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. मला चाहते वारंवार एकच प्रश्न विचारताय की प्रार्थना मॅम तुमचा पुढचा चित्रपट कधी येणार. त्यावर माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. मी कुठे गायब आहे, असं चाहते मला विचारायचे.”

पुढे प्रार्थना म्हणाली, “यावरून मला एक कळालं, चाहते आपल्याला पाहायला उत्सुक असतात. परंतु, जेव्हा तुम्ही सगळ्यांच्या दृष्टीआड होता तेव्हा तुम्ही इतरांच्या डोक्यातूनही निघून जाता. तुम्ही काय करता याचा कोणाला फारसा फरक पडत नाही. त्यामुळे इथे तुम्हाला तुमच्या असण्याची समोरच्याला जाणीव करून द्यावी लागते. मी प्रेक्षकांच्या विस्मरणात जाऊ नये म्हणून मी मालिका करण्याचा निर्णय घेतला. मी अनेक वर्षांनंतर मालिका करत आहे त्यामुळे दिग्दर्शकांना मला नवीन कलाकाराप्रमाणे वागणूक देण्यासाठी बजावलं आहे कारण मला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत.”

या मालिकेत प्रार्थनासोबत लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत आहे. मालिकेतून श्रेयसदेखील जवळपास १७ वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार आहे. मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकही मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या