प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रसाद ओक लवकरच दिग्गज अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावर आधारित बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. आज निळू फुले यांची जयंती आहे. त्यानिमित्तानं प्रसाद ओकनं त्याच्या इन्स्टाग्रामवर निळू फुले यांच्यासाठी एक पोस्ट लिहिली आहे. सध्या सोशल मीडियावर प्रसाद ओकची ही इन्स्टाग्राम पोस्ट बरीच चर्चेत आहे.

निळू फुले यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रसाद ओकनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट लिहिताना प्रसाद ओक भावुक झालेला दिसत आहे. प्रसाद ओकनं त्याच्या पोस्टमध्ये निळू फुले यांची मुलगी गार्गी फुले यांनाही टॅग केलं आहे. आपल्या या पोस्टमधून त्यानं निळू फुले यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
pune ajit pawar marathi news, Ajit pawar son jay pawar marathi news, jay pawar latest news in marathi
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन
pankaj-udhas
पंकज उधास यांची पत्नी फरीदा यांनी त्यांच्या पहिल्या अल्बमसाठी ‘अशी’ केलेली पैशांची जमवा जमव
raj thackeray shrikant shinde marathi news, raj thackeray ulhasnagar firing case marathi news
श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघात मनसेचे समर्थन कुणाला ? राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे संभ्रम वाढला

आणखी वाचा- सलमान- अक्षय- सैफ पोहोचले शाहरुख खानच्या ‘मन्नत’वर, वाचा नेमकं काय घडलं

आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये प्रसाद ओकनं लिहिलं, ‘निळूभाऊ…आज तुमचा वाढदिवस…! तुमच्या सहवासातली ती दोन अडीच वर्ष माझ्या आयुष्यातली सर्वात अविस्मरणीय होती भाऊ. तुम्हाला खूप जवळून पाहता आलं…अनुभवता आलं… तुमच्याकडून बरंच काही शिकलो… तुम्हाला न सांगता तुम्हाला मनोमन ‘गुरु’च मानलं… तुमचा आशीर्वाद म्हणूनच कि काय तुमच्यावरचा जीवनपट दिग्दर्शित करण्याची संधी मला मिळाली आहे. तो फक्त एक चित्रपट नसेल तर मी तुम्हाला दिलेली ‘गुरुदक्षिणा’ असेल…! फक्त पाठीवर तुमचा हात कायम राहू द्या भाऊ…!’

आणखी वाचा- … अन् ‘त्या’ प्रश्नावरुन भर कार्यक्रमात मीका सिंगने केली शिवीगाळ!

प्रसाद ओकची ही इन्स्टाग्राम पोस्ट सध्या सगळीकडे चर्चेत आहे. दरम्यान, २५० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारे निळू फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसाद ओक करणार आहे. मात्र निळू फुले यांच्या भूमिकेत कोणता अभिनेता दिसणार आहे याबाबत मात्र कोणतीही माहिती समोर आलेली नाही.