अभिनेता प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन काही महिने उलटले असले तरी चित्रपटाची क्रेझ मात्र कायम आहे. या चित्रपटाची, त्यातील डायलॉगची चर्चा सोशल मीडियावर कायमच सुरु असते. प्रसाद ओकचा ‘धर्मवीर’ चित्रपट आणि त्यातील आनंद दिघे यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली होती. नुकतचं झी मराठीवर धर्मवीर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर प्रसाद ओकने शेअर केलेली इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत आहे. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या प्रसाद ओकने 'धर्मवीर'च्या टेलिव्हिजन प्रिमियरनंतर इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली. त्याने लिहिलं, "थिएटर्स मध्ये गाजला, OTT वर वाजला आणि काल झी मराठीवर तुमच्या प्रेमामुळे सजला… #धर्मवीर… पुन्हा एकदा इतके मेसेजेस आणि कॉल्स आलेत कालपासून, अभिनंदनाचे आणि कौतुकाचे की, असं वाटलं तुम्हा सगळ्या प्रेक्षकांनाच एकदा SALUTE करावा….!!!! असंच प्रेम कायम राहू द्या…!!!"आणखी वाचा- पूजा सावंतला करायचंय ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडशी लग्न! आपल्या या पोस्टमधून प्रसाद ओकने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. याआधी प्रसाद ओकनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत त्याने ही भूमिका त्याला कशी मिळाली, त्याचा प्रसाद ओक ते दिघे साहेब हा प्रवास कसा घडला याबद्दल भाष्य केले होतं. आणखी वाचा- “दिघे साहेबांची गोष्ट खोटी…” प्रसाद ओकचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत दरम्यान दरम्यान ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाला. ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट १३ मे २०२२ ला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केलं आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.