करोना कालावधीपासून ते अगदी आतापर्यंत महाराष्ट्रातील जनतेला खळखळून हसवणारा शो म्हणून सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला ओळखले जाते. समीर चौगुले, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर यासारखे जुने कलाकार असो किंवा दत्तू मोरे, शिवाली परब, ओंकार भोजने असो या साऱ्या कलाकारांनी साकारलेली पात्र आणि सादर केलेले स्किट्स हे महाराष्ट्रातील घराघरामध्ये पोहोचली आहेत. याच कार्यक्रमात हास्यवीर म्हणून सहभागी झालेला अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. नुकतंच प्रसाद ओकने इन्स्टाग्रामवर पार्टीबद्दलची एक पोस्ट शेअर केली आहे.

प्रसाद ओक हा इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतो. नुकतंच प्रसादने एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्याने पार्टी देणार अशा आशयाचे टी-शर्ट परिधान केले आहे. यासोबत त्याने एक छान कॅप्शन दिली आहे. त्याचे हे कॅप्शन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

gaming sports
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोर्चा आता ऑनलाईन गेमिंगकडे, इन्फ्लुअन्सर्सची भेट घेऊन केली ‘या’ विषयावर चर्चा
Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
youth was kidnapped
खळबळजनक..! मृतदेहाची इन्स्टाला स्टोरी (स्टेटस) ठेवली; ‘त्या’ तरुणाची अपहरण करून केली हत्या
Kangana Ranut Old Video viral
“कंगना, तू उर्मिला मातोंडकरला ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ म्हटलं होतं त्याचं काय?”, अश्लील पोस्ट प्रकरणानंतर ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

प्रसाद ओकची इन्स्टाग्राम पोस्ट

“चंद्रमुखी” आणि “धर्मवीर” दोन्ही चित्रपटांवर पुरस्कारांचा पाऊस पडायला सुरुवात झालीय… So आता “ते सगळे” PARTY साठी मागे लागणारच आहेत…

मी आजच देणार होतो पार्टी… पण नेमका श्रावण सुरु झाला. आता पार्टी ठरेपर्यंत हस्तलिखित कडून आलेला हा टी-शर्ट “हास्यजत्रा” टीम ला समर्पित, असे प्रसाद ओकने म्हटले आहे.

दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून हास्यजत्रा या सेटवर त्यातील कलाकारांकडून प्रसाद ओकला पार्टी कधी देणार असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र प्रसादने यावर उत्तर दिले नव्हते. मात्र नुकतंच त्याने ही बोलकी पोस्ट केली आहे.

“फक्त मराठी सिने सन्मान २०२२” च्या पुरस्कार सोहळ्यात धर्मवीर या चित्रपटाने तब्बल ७ पुरस्कार पटकावले आहेत. ज्यामध्ये सर्वात्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट लेखन प्रविण विठ्ठल तरडे, सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रसाद ओक, सर्वोत्कृष्ट गीतलेखन मंगेश कांगणे, सर्वोत्कृष्ट गायक आदर्श शिंदे, सर्वोत्कृष्ट रंगभूषा विद्याधर भट्टे यांना मिळाले आहेत. अभिनेता मंगेश देसाई यांच्या साहील मोशन पिक्चर्सनं आणि झी स्टुडिओजने “धर्मवीर” या चित्रपटाची निर्मिती केली. प्रवीण तरडे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.