“दिघे साहेबांची गोष्ट खोटी…” प्रसाद ओकचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

Dharamveer, Dharamveer Movie, anand dighe, pravin tarade, Marathi Movie Dharamveer, Prajakta Mali, Prasad Oak, anand dighe biopic, Dharamveer movie, Salman Khan, Dharamveer Trailer Launch
प्रसाद ओकने शेअर केलेली इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत आहे.

अभिनेता प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन काही महिने उलटले असले तरी चित्रपटाची क्रेझ मात्र कायम आहे. या चित्रपटाची, त्यातील डायलॉगची चर्चा सोशल मीडियावर कायमच सुरु असते. प्रसाद ओकचा ‘धर्मवीर’ चित्रपट आणि त्यातील आनंद दिघे यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली होती. नुकतचं झी मराठीवर धर्मवीर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या निमित्ताने प्रसाद ओकने ही भूमिका कशी साकारली, त्याचे गुपित काय याचा खुलासा केला.

उद्धव ठाकरे येण्याचे कळताच शिंदे गटाकडून आनंद आश्रम हायजॅकचा प्रयत्न

नुकतंच झी मराठीने त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो त्याला ही भूमिका कशी मिळाली, त्याचा प्रसाद ओक ते दिघे साहेब हा प्रवास कसा घडला याबद्दल भाष्य केले आहे. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?

“दिघे साहेबांची गोष्ट खोटी वाटावी इतकी खरी आहे. ज्या उद्देषाने मंगेश देसाईंनी हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मी गुगलवर सर्च केलं तेव्हा दोन तीन गोष्टी समोर आल्या. एक म्हणजे सिंघानिया रुग्णालय आणि त्यानंतर एक दोन वाईट गोष्टी एवढंच येतं. ते सर्व पुसलं जावं आणि त्यांचं महान कार्य, त्यांचं काम किती मोठं आहे हे लोकांसमोर यावं. अनेक लोकांशी बोलून जेव्हा १० ते १२ लोकांकडून एक किस्सा पुन्हा पुन्हा सांगितला जायचा, तेव्हा तो किती खरा होता हे समजायचे आणि तेच दृश्य त्याने चित्रपटात दाखवले आहेत.

त्यामुळे चित्रपटात दाखवलेल्या सर्व घटना या खऱ्या आहेत. मी मोबाईल चेक करण्यासाठी उठलो तेव्हा ८ ते १० मिस्डकॉल्स होते. त्यातले ४ मिसकॉल हे मंगेश देसाई यांचे होते. त्यानंतर मी ताबडतोब त्याला फोन केला. त्याने मला काय करतोस असे विचारले तेव्हा काहीही नाही घरीच आहे, असे त्याला सांगितले. त्यानंतर त्याने मला १४ तारखेचा दुपारी २ ते २.३० पर्यंतचा वेळ मोकळा ठेव असे मला सांगितले.

मी तिथे गेलो आणि त्यांनी माझा मेकअप करायला सांगितले. मेकअप दादांनी माझ्या डोळ्याखाली असलेले डार्क सर्कल अजून गडद केले. त्यानंतर त्यांनी मला दाढी लावली. मिशी लावली. त्यानंतर केसांचा विग देखील लावला. मी त्यावेळी त्यांना कशासाठी मेकअप करताय असे विचारले. त्यावेळी मंगेश देसाईंनी तुम्हाला काही सांगितले नाही का? असं विचारले. मी नाही म्हणून सांगितले. यानंतर त्यांनी मला कपडे घालायला सांगितले आणि बाहेर जा असे सांगितले. त्यावेळी एक व्यक्ती माझ्यासमोर आला आणि त्याने लांबून मला पाहतच हे दिघे साहेब.. असे म्हटले. यानंतर मंगेश देसाई मला म्हणाला, बस्स आपण पहिला टप्पा जिंकलोय पश्या.

ज्या माणसाला लाखो करोडो माणसं देव मानतात, दैवत मानतात अशा माणसाची भूमिका करण्याचे भाग्य माझ्या वाट्याला आलं. पण ते तितक्यात सक्षमपणे ताकदीने मला निभवता आलं पाहिजे असं टेन्शनही माझ्या डोक्यात होते. त्यावेळी मला आनंदही होता आणि प्रचंड दुखंही होते. त्यांचे फोटो व्हिडीओ पाहून मी ती भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट डोळे होते. डोळ्यांचा मेकअप मॅन करु शकत नाही.

मी प्रत्येक वेळेला जेव्हा शॉट करायला जायचो तेव्हा दिघे साहेबांचा फोटो पाहायचो आणि तेव्हा त्यांच्यासमोर हात जोडायचो आणि एकच मागण मागायचो ते म्हणजे त्यांचा आशीर्वाद. मला तुमचा आशीर्वाद तुमच्या डोळ्यांच्या रुपाने द्या, असे मी त्यांना वारंवार सांगायचो. असे चित्रपट वारंवार निर्माण होत नाही. खूप वर्षांनी होतात. पण त्याचा परिणाम वर्षांनुवर्षे राहतो”, असे प्रसाद ओक म्हणाला.

आनंद दिघे जयंती: टेंभी नाक्यावर शिंदे-ठाकरे गट आमने-सामने, उद्धव ठाकरेंच्या ‘लांडगे’ वक्तव्याला मुख्यमंत्री उत्तर देणार?

दरम्यान दरम्यान ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाला. ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट १३ मे २०२२ ला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केलं आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-08-2022 at 14:09 IST
Next Story
अभिनेत्री महिमा चौधरी यांचा ‘इमर्जन्सी’ चित्रपटातील फर्स्ट लूक आउट, दिसणार ‘या’ भूमिकेत
Exit mobile version