‘कॅज्युअल सेक्स’बद्दल प्रतीक बब्बर म्हणतो, “मला यात काही चुकीच वाटतं नाही, मी सुद्धा…”

प्रतीकने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

prateik babbar, Hickups & Hookups,
प्रतीकने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बरने ‘जाने तू या जाने ना’, ‘बागी 2’ आणि ‘छिछोरे’ सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांची मने जिंकली. गेल्या काही दिवसांपासून प्रतीक ‘Hickups & Hookups’ या त्याच्या आगामी शोमुळे चर्चेत आहे. हा शो लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या शोमध्ये कॅज्युअल सेक्स आणि नातेसंबंधांमध्ये असलेला बोल्डनेस दाखवण्यात येणार आहे. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रतीकने कॅज्युअल सेक्सवर चर्चा केली आहे.

प्रतीकने नुकतीच एनबीटीला मुलाखत दिली यावेळी ‘कॅज्युएल सेक्स विषयी तो काय विचार करतो? आणि सीरिजमध्ये असा काही भाग दाखवण्यात आला आहे का?’ असा प्रश्न प्रतीकला विचारण्यात आला होता. “मला यात काही चुकीचं वाटतं नाही. असे बरेच लोक आहेत ज्यांचा कमिटमेंट, रिलेशनशिप किंवा मग प्रेमावर विश्वास नसतो, त्यांचा कॅज्युअल सेक्सवर विश्वास असतो. हो, मी सुद्धा हे करून पाहिलं आहे. मला वाटतं की कधी कधी लोक यातून जातात. वन नाईट स्टँड, फ्लिंग, हुकअप, यातूनही मी गेलो आहे”, असे प्रतीक म्हणाला.

आणखी वाचा : निलेश साबळेने पाया पडून मागितली नारायण राणेंची माफी; जाणून घ्या कारण

आणखी वाचा : प्रियांका होणार आई? निकसोबत चाहत्यांनाही बसला धक्का

पुढे प्रतीक म्हणाला, “हे तरुण पिढीपासून ते आपल्या आयुष्यात मध्ये कधी तरी कुठेही होऊ शकतं. असं कोणत्याही पुरुष किंवा स्त्रीला वाटू शकतं आणि तेव्हा तुम्हाला स्वतःला पुन्हा एकदा शोधायचं असतं. या सीरिज विषयी आम्हाला २ प्रकारच्या प्रितिक्रिया मिळाल्या आहेत. काही लोक म्हणाले की, ज्या मुद्द्यांवर शतकानुशतके कोणी काही बोललं नाही, त्या गोष्टी तुम्ही सगळ्यांसमोर मांडत आहात. तर काही लोकांचे असे म्हणणे आहे, पवित्र नात्यांविषयी असे काही दाखवणे चुकीचे आहे.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Prateik babbar says nothing wrong in casual sex reveals he himself tried it dcp

ताज्या बातम्या