VIDEO : अभिनेता-दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे सुपरहिट, अन् वयाच्या ७९व्या वर्षी शेतामध्ये कष्ट करताहेत वडील

प्रवीण तरडे यांनी वडिलांच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे.

pravin tarde movies Pravin Tarde Latest News
प्रवीण तरडे यांनी वडिलांच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शकांच्या यादीमध्ये अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचं नाव टॉपला आहे. एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट प्रवीण करत आहेत. ‘धर्मवीर’, ‘सरसेनापती हंबीरराव’ हे त्यांचे अलिकडेच प्रदर्शित झालेले दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. पण तुम्हाला माहित आहे का? प्रवीण यांचं शेतीवर अधिक प्रेम आहे. शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. म्हणूनच आजही त्यांचे वडील शेतामध्ये कष्ट करताना दिसतात. प्रवीण यांनी वडिलांचा एक व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

आणखी वाचा – “बॉलिवूडवर अंडरवर्ल्ड डॉनचं वर्चस्व आणि…”, अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा मोठा खुलासा

शेतकरी असल्याचा आपल्याला अभिमान आहे हे प्रवीण यांच्या बोलण्यामधून सतत जाणवतं. प्रवीण स्वतः कामामधून ब्रेक मिळताच शेती करतात. त्यांचे वडील विठ्ठल तरडे यांचं वय आता ७९ वर्ष आहे. तरीही आज ते तितक्याच मेहनतीने शेतात काम करताना दिसतात. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण यांनी त्यांचा शेतामध्ये काम करत असताना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांची बरीच पसंती मिळताना दिसत आहे.

प्रवीण यांनी वडिलांचा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, “आज माझ्या वडिलांचा विठ्ठलरावांचा ७९ वा वाढदिवस. पुढच्या वर्षी सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा. पांडुरंगाच्या चरणी एकच इच्छा शंभरीपर्यंत त्यांना असंच आरोग्य लाभू दे. खूप शुभेच्छा दादा.” या व्हिडीओमध्ये प्रवीण यांचे वडील शेतात काम करताना दिसत आहेत. पावसाळ्यामध्ये शेतीच्या कामामध्ये ते व्यग्र झाले आहेत.

पाहा व्हिडीओ –

आणखी वाचा – Boyz 3 Teaser : पुन्हा एकदा तुफान राडा, ‘बॉईज ३’चा धमाकेदार टीझर पाहिलात का?

तसेच या व्हिडीओमध्ये ते “विठुचा गजर हरिनामाचा…” गाताना दिसत आहेत. काम करत असताना ते पांडुरंगाच्या भक्तीत मग्न झाल्याचं यामध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून प्रवीण यांच्या वडिलांना अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांचं कौतुक देखील नेटकरी करत आहेत. मुलगा आज कोट्यावधी रुपये कमावत असला तरी वडील मात्र सामान्य शेतकरीप्रमाणे काम करतात हे कौतुकास्पदच आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pravin tarde share his father video on 79 birthday marathi actor director post viral on social media kmd

Next Story
आलियाशी लग्न करण्याआधीच विवाहित आहे रणबीर? पहिल्या पत्नीबाबत केला खुलासा
फोटो गॅलरी