“मी कायदेशीर कारवाई करेन”; खोट्या ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्यांवर प्रविण तरडे संतापले

गणपती प्रतिष्ठापनेतील चुकीवर प्रवीण तरडे यांनी पुन्हा एकदा दिली प्रतिक्रिया

दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी अभिनेता-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या घरी गणरायाचं आगमन झालं. मात्र यंदा गणपती बाप्पाच्या सजावटीत त्यांच्या हातून एक चूक झाली. या चूकीसाठी त्यांच्यावर सोशल मीडियाद्वारे जोरदार केली गेली. या प्रकरणी त्यांनी माफी देखील मागितली. परंतु तरीही त्यांच्या घरावर हल्ला केला जात असल्याच्या काही बातम्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. मात्र या केवळ अफवा असल्याचं प्रविण तरडे यांनी स्पष्ट केलं आहे. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी चूकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

प्रविण तरडे यांनी एका फेसबुक व्हिडीओद्वारे या प्रकरणावर पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “माझ्या हातून घडलेल्या चूकीसाठी मी माफी मागितली आहे. लोकांनी मला माफ देखील केलं आहे. परंतु काही मंडळी केवळ दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी माझ्या नावाचा गैरफायदा घेत आहेत. माझ्या नावाने काही खोट्या बातम्या पसरवत आहेत. गेल्या तीन दिवसांत अनेक राजकीय पक्ष व कार्यकर्त्यांशी मी फोनवर बोललो. कोणीही मला धमकी वगैरे दिलेली नाही, कोणीही माझ्या घरावर, ऑफिसवर हल्ला केलेला नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका. चूकीच्या माहितीच्या आधारावर कोणावरही टीका टिप्पणी करु नका ही सर्वांना विनंती आहे. खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर मी लवकरच कायदेशीर कारवाई करणार आहे.”

प्रविण तरडे यांनी काय चूक केली होती?

प्रवीण तरडे नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळा विचार करत असल्याने चर्चेत असतात. यावेळी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी ‘पुस्तक गपणती’ ही संकल्पना ठेवत डेकोरेशन केलं होतं. त्याचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. पण यानंतर काही वेळातच त्यांच्यावर टीकेची झोड उठण्यास सुरुवात झाली. प्रवीण तरडे यांनी गणेशमूर्तीच्या बाजूला पुस्तकांची सजावट केली होती. पण मूर्ती ज्या पाटावर ठेवली होती त्याच्या खाली संविधानाचे पुस्तक ठेवले होते. यावरुन सोशल मीडियावर त्यांना ट्रोल व्हावे लागले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pravin vitthal tarde comment on fake news about him video viral mppg

ताज्या बातम्या