‘डिलिव्हरीसाठी १० हजार रुपयेसुद्धा नव्हते’, नीना गुप्ता यांनी केला खुलासा

त्यांच्या ऑटोबायोग्राफीत नीना यांनी हा खुलासा केला आहे. हे पुस्तक १४ जून रोजी प्रकाशित होणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांनी आजवर अनेक खुलासे केले आहेत. दरम्यान, नीना यांनी त्यांच्या पुस्तकात त्यांची मुलगी मसाबाला जन्म देताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला हा खुलासा केला आहे. याचा फोटो मसाबाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मसाबाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केला आहे. मसाबाने ‘सच कहूं तो’ यातील काही ओळी शेअर केल्या आहेत. नीना जेव्हा मसाबाला जन्म देणार होत्या तेव्हा त्यांच्याकडे पुरेसे पैसे देखील नव्हते. ज्यामध्ये असे सांगितले गेले आहे की जेव्हा नीना गुप्ता मसाबाला जन्म देणार होत्या, तेव्हा त्यांच्याकडे ऑपरेशन करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. “माझा जन्म झाला तेव्हा माझ्या आईच्या बँक खात्यात २ हजार रुपये होते. मी आईचे ऑटोबायोग्राफी वाचत असताना मला बर्‍याच गोष्टी आणि तिने सहन केलेल्या सगळ्या गोष्टीतून काहीतरी शिकता आले. मी प्रत्येक दिवस खूप मेहनत करते आणि तिने मला या जगात आणल्याबद्दल मला तिची परत फेड करता येईल…ती सुद्धा व्याजासोबत यासाठी मी प्रयत्न करते,” अशा आशयाचे कॅप्शन मसाबाने तो फोटो शेअर करत दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Masaba (@masabagupta)

नीना यांच्या ऑटोबायोग्राफीत त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. नीना म्हणाल्या, “माझी डिलिव्हरीची तारीख जसजशी जवळ येत होती, आणि बॅंकेच्या खात्यात पैसे कमी असल्याने मला भीती वाटू लागली. मला बाळाला फक्त नैसर्गिक पद्धतीने जन्म देणे शक्य झाले असते कारण यासाठी फक्त २ हजार रुपयांची गरज होती. पण मला ठाऊक होते की जर मला सी-सेक्शन पद्धतीने करावे लागले तर मी अडचणीत येईल कारण शस्त्रक्रियेसाठी जवळपास दहा हजार रुपये लागणार होते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

पुढे त्यांनी अजून पैसे कसे मिळाले या बद्दल सांगितलं आहे. त्या म्हणाला, “सुदैवाने माझ्या प्रसूतीच्या काही दिवस आधी मला टॅक्स रिम्बर्समेंटचे १० हजार रुपये मिळाले आणि शेवटी माझ्या बँक खात्यात १२ हजार रुपये झाले. चांगली गोष्ट म्हणजे पैसे आले, कारण माझ्या डॉक्टरांनी मला सांगितले की मला सी सेक्शन डिलिव्हरी करावी लागेल. प्रसुतीवेळी मदत करण्यासाठी माझ्यासोबत असलेले माझे वडील रुग्णालयातून रागात खाली आले आणि म्हणाले की हे लोक फक्त आपल्याकडून जास्त पैसे आकारण्यासाठी हे सगळं सांगत आहेत.”

आणखी वाचा : …म्हणून करण जोहरने तीन वेळा माझ्याशी लग्न करण्यास दिला नकार, नेहा धुपियाने केला खुलासा

नीना गुप्ता यांची ऑटोबायोग्राफी ही १४ जूनला प्रकाशित होणार आहे. या पुस्तकात नीना यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात, विव्हियन रिचर्ड्सची कहाणी आणि त्याच्यासोबत एकटी आई म्हणून मसाबाला कसे सांभाळले असे अनेक खुलासे केले आहेत. चित्रपटसृष्टीत असलेले राजकारण, कास्टिंग काउच सारख्या अनेक गोष्टींवर देखील त्यांनी चर्चा केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pregnant neena gupta did not have enough amount for c section delivery dcp

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या