वयाच्या ४६व्या वर्षी प्रीति झिंटाने दिली गूड न्यूज

सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाली…

Preity Zinta, Preity Zinta baby, Preity Zinta twins, Gene Goodenough, Gene Goodenough Preity Zinta, Preity Zinta news, Gene Goodenough Preity Zinta baby

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील अभिनेत्री प्रीति झिंटाने चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे. ती जुळ्या मुलांची आई झाली आहे. प्रीतिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर सरोगसीद्वारे दोन मुलांची आई झाल्याचे सांगितले आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रीतिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पतीसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘मी तुम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी देऊ इच्छिते. मी आणि माझा पती जीन खूप आनंदी आहे. आमच्या घरी जुळ्या बाळांचे आगमन झाले आहे. त्या दोघांची नावे जय आणि जिया अशी आहेत’ या आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे.
आणखी वाचा : ‘राणी मुखर्जीला किस करणे…’, सैफ अली खानने सांगितला धक्कादायक अनुभव

प्रीति झिंटाने तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान जीन गुडइनफसोबत गुपचूप लग्न केले. फेब्रुवारी २०१६ रोजी लॉस एंजलसमध्ये अगदी खाजगी सोहळा करत तिने हे लग्न केलं. प्रीति आणि जीनने अतिशय गुपचूप लग्न केलं होतं. त्यांच्या वेडिंगचे फोटो जवळपास सहा महिन्यांनी मीडिया समोर आले होते. आता लग्नाच्या जवळपास पाच वर्षांनंतर प्रीति आई झाली आहे. तिला सरोगसीद्वारे जुळ्याची मुले झाली आहेत.

यापूर्वी प्रीति झिंटाने ३४ अनाथ मुलींना दत्तक घेतले आहे. प्रीति झिंटाने लग्नापुर्वीच २००९ साली या ३४ मुलींचा सर्व खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली. उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये शीशम झाडी येथील मदर मिरेकल स्कूलमधील ३४ मुली तिने दत्तक घेतल्या. वर्षातून दोन वेळा प्रीति झिंटा ही दत्तक घेतलेल्या ३४ मुलींना भेटण्यासाठी जात असते. आता प्रीतिला सरोगसीद्वारे जुळ्याची मुले झाली आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Preity zinta gene goodenough welcome twins via surrogacy avb