Video: “आणि काय हवं?”, लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर…

उमेश आणि प्रियाने लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘डिजिटल अड्डा’वर मनसोक्त गप्पा मारल्या आहेत

priya bapat and umesh kamat, priya bapat, umesh kamat, ani kay hav, ani kay hav,
वरूण नार्वेकर दिग्दर्शित ‘आणि काय हवं’चा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

मराठी सिनेसृष्टीतील क्यूट कपल म्हणजेच अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट पुन्हा एकदा “आणि काय हवं?” या वेब सीरिजच्या तिसऱ्या सिझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या वेब सीरिजमधील त्यांची जूई आणि साकेत ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. तिसऱ्या सिझनमध्ये आता जुई आणि साकेतच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांचं नातं कोणत्या वळणारवर आलंय हे पाहायला मिळणार आहे. या वेब शोच्या निमित्ताने उमेश आणि प्रियाने लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘डिजिटल अड्डा’वर मनसोक्त गप्पा मारल्या आहेत.

हल्लीचे करिअर ओरिएंटेड कपल्स घरीसुद्धा ऑफिस घेऊन येतात. दिवसभर ऑफिसमध्ये केलेली कामे, तिथले ताणतणाव, चिडचिड, बॉस, सहकाऱ्यांसोबतचे संवाद अशा अनेक गोष्टी ऑफिस सुटल्यावर घरी सुद्धा येतात. अनेकदा घरी आल्यावरही आपल्या पार्टनरसोबत त्याच्याच चर्चा रंगतात. नवरा बायकोच्या हेल्दी रिलेशनशीपसाठी हे कधी नुकसान करणारेही ठरू शकते. याच गोष्टी कधी कधी भांडणासाठी कारणीभूत ठरतात. अशा वेळी या चर्चा टाळून एकमेकांना वेळ देत आपण आपले नाते अधिकच दृढ करू शकतो, हे एमएक्स एक्सक्लुझिव्ह आणि मिर्ची ओरिजनल्स क्रिएशन निर्मित, वरूण नार्वेकर दिग्दर्शित ‘आणि काय हवं’च्या तिसऱ्या सिझन मध्ये दाखवण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Priya bapat and umesh kamat ani kay hav web series avb

ताज्या बातम्या