बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनसशी लग्न केले. ते दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकतेच त्यांनी ख्रिसमसचे साजरा करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

ख्रिसमसचे हे फोटो निक जोनसने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोत प्रियांकाने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर ती निकच्या कुशीत बसली आहे. निक प्रियांकाला किस करत आहे. या फोटोत निक आणि प्रियांकाचे श्वान दिसत आहेत. डायना प्रियांकाच्या कुशीत आहे. तर जिनो आणि पांडा हे त्या दोघांच्या बाजुला आहेत. हा फोटो शेअर करत “आमच्या कुटुंबाकडून तुमच्या कुटुंबाला मेरी ख्रिसमस”, असे कॅप्शन निकने दिले आहे.

आणखी वाचा : बिग बींचा दाऊद इब्राहिमसोबतचा फोटो व्हायरल? अभिषेकने दिले होते स्पष्टीकरण

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांकाला ख्रिसमच्या पार्टीची तयारी सुरु केलीस का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी प्रियांका म्हणाली की, ती सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यावेळी पती निक जोनस ख्रिसमच्या पार्टीची तयारी करत आहे. त्यासोबत संपूर्ण कुटुंबासाठी गिफ्ट घेण्याच काम ही तोच करत आहे.

आणखी वाचा : Atrangi Re Movie Review: गोष्ट लव्ह ट्रँगलची पण…

प्रियांका सध्या ‘The Matrix: Resurrections’ या तिच्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. तिचे प्रमोशनमधले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. हा चित्रपट २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील तिच्या स्क्रिन टायमिंगवरून तिला अनेकांनी ट्रोल केले आहे.